भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद ठेवून शहरातील नागरिकांना सातत्याने वेठीस धरणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट अखेर आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रद्द केले आहे. या कंत्राटदाराचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाशी संगनमत असल्याचा आरोप करीत आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार केली होती. जैन यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.मीरा भार्इंदर महापालिकेने बससेवा चालविण्यासाठी गेल्या वर्षी मनोहर सकपाळ यांच्या भागीरथी एमबीएमटीला कंत्राट दिले होते. कोरोनामुळे बससेवा केवळ परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी तसेच पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करण्यासाठी चालवली गेली. त्यानंतर मेपासून पालिकेने कंत्राटदारास बससेवा सुरू करण्यास सांगूनही बस चालवल्या नाहीत. कंत्राटदाराने आॅगस्टपासून केवळ उत्तन मार्गावर पाच बस सुरू केल्या त्याही ८ सप्टेंबरपासून बंद पडल्या.कंत्राटदाराने २५ सप्टेंबरपासून १० बस तर २८ सप्टेंबरपासून २१ बस चालवण्याचे सांगूनही सुरूच केल्या नाहीत. बससेवा नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. पालिका आणि सत्ताधारी भाजपने नागरिकांची गैरसोय दूर करण्याऐवजी कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करून दिल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सरनाईक यांनी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांना केली.वारंवार सांगूनही केले दुर्लक्षकंत्राटदारास मोफत बस दिल्या, अत्याधुनिक डेपो - साहित्य दिले, तिकीट व जाहिरातीचे उत्पन्न दिले. अतिरिक्त पैसे देऊनही त्याला प्रचंड आर्थिक फायदा करूनही तो बस चालवत नसल्याने आमदार जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर आयुक्तांनी सोमवारी कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. वारंवार सांगूनही बससेवा सुरू न केल्याने मूळ करारनाम्यासह पुरवणी करारनामाही रद्द केला आहे.वारंवार सांगूनही बससेवा सुरू करत नसल्याने भागीरथीचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, नागरिकांची तातडीची गरज पाहता पालिका बससेवा सुरू करण्याबाबत विचार करीत आहे. परिवहन समितीसमोर प्रस्ताव ठेवून त्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल.- अजित मुठे, उपायुक्त, परिवहन
परिवहन सेवेचे कंत्राट अखेर केले रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:25 AM