कल्याण-डोंबिवलीला जोडणारे ठाकुर्ली हे शहर आहे. मात्र, महापालिकेच्या परिवहन सेवेने अजूनही ठाकुर्ली जोडले गेलेले नाही. तत्कालीन नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २००९ मध्ये डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातून सुटणारी केडीएमटीची मिनी बस पंचायत विहिरमार्गे चोळेगाव निवासी विभागाची बस सुरू केली होती. ही बस वर्षभर यशस्वीपणे धावली. मात्र, वाढती वाहतूक कोंडी, अवघ्या पाचच मिनी बस असल्याने त्यांच्या देखभाल व दुरुस्तीअभावी या मार्गावरील बस प्रशासनाला बंद करावी लागली.परिवहन सदस्य मनोज चौधरी व कचोरे प्रभागाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे केडीएमटीने कल्याण-डोंबिवली बस बाजीप्रभू चौक-घरडा सर्कल-९० फुटी रस्ता- म्हसोबा चौक-समांतर रस्त्याने कल्याणपर्यंत सुरू केली आहे. मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या मार्गाचे तिकीट अवघे १० रुपयेच ठेवले आहे. या बसचा जुन्या ठाकुर्लीतील नागरिकांना तसा काहीच फायदा नाही. समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याजवळच्या रहिवाशांसाठी मात्र हा मार्ग फायदेशीर आहे. केडीएमटीने सध्या बस थांबे लावले आहेत. मात्र, त्यावर बसच्या वेळा लिहिलेल्या नाहीत. त्यामुळे येथील रहिवासी बसवर अवलंबून न राहता स्वत:ची वाहने आणि रिक्षेने प्रवास करतात. परिणामी केडीएमटीची रिकामीच बस या मार्गाने धावते. केडीएमटी आता प्रमुख ठिकाणी स्टीलचे बसथांबे उभारणार आहे. त्यामुळे भविष्यात सक्षम परिवहन सेवा मिळू शकते. विशेष म्हणजे, केडीएमटीपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने या मार्गावर बस सुरू केली होती. मात्र, अपुरी जागृती, बसथांब्यांचा अभाव यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी त्यांनीही या मार्गावरील बस बंद केल्या.समांतर रस्त्यावर सध्या लक्ष्मी पार्क, ९० फुटी रस्त्यावर चामुंडा गार्डन गृहसंकुल, मंगलमूर्ती गॅस एजन्सी येथेच रिक्षा उभ्या राहतात. त्यामुळे अन्य ठिकाणच्या रहिवाशांना रिक्षेसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लगते. ९० फुटी रस्त्यावरील नागरिक टाटा पॉवर लाइन ते घरडा सर्कल रस्त्यावर जाऊन शेअर रिक्षेने कल्याण किंवा डोंबिवली गाठतात. डोंबिवलीहून समांतर रस्त्यावर जाण्यासाठी रिक्षाचालक ५० ते ६० रुपये तर ठाकुर्लीहून ४० ते ५० रुपये आकारतात. त्यामुळे येथील रहिवाशांच्या खिशाला कात्री लागते. डोंबिवलीतील नाट्यरसिकांना सावित्रीबाई फुले कलामंदिरात जाता यावे, यासाठी केडीएमटीने बंदीश पॅलेस चौकापर्यंत अवघ्या पाच रुपयात बस सुविधा दिली आहे. मात्र, निवासी विभागापर्यंत जाणारी बस फुले कलामंदिरामार्गे वळवावी, अशी त्यांची मागणी कायम आहे.एमआयडीसी परिसरात कामाला जाणारे अनेक कर्मचारी ठाकुर्लीतून ये-जा करतात. त्यांच्या सोयीसाठी केडीएमटीने सकाळी व संध्याकाळी काही ठराविक वेळेत स्थानकापासून विको नाकापर्यंत बससेवा उपलब्ध करून द्यायला हवी. शेअर रिक्षाही सुरू झाल्यास अनेकांना दिलासा मिळेल. नाट्यरसिक, बीएसएनएल, एलआयसी कार्यालय, क्रीडासंकुल, पेंढरकर महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी यांना त्याचा फायदा होऊ शकतो. खंबाळपाडा परिसरात जाणारे विद्यार्थी व नागरिकांसाठीही ठाकुर्ली स्थानक अथवा म्हसोबा चौकातून शेअर रिक्षा फायद्याची ठरू शकते.विरंगुळा केंद्रे, मैदानांची गरजप्रशस्त समांतर रस्त्याचे कांचनगाव, खंबाळपाडा, चोळेगाव आणि कचोरे कोळीवाडा येथील रहिवाशांसाठी विरंगुळा ठरत आहे. या रस्त्याला लागूनच असलेले पदपथ, कठडे, खाडी परिसरामुळे मोकळी हवा व चांगल्या दर्जाचे पथदिवे यामुळे डोंबिवली व अन्य ठिकाणांहूनही नागरिक विशेषत: युवा पिढी येथे सायंकाळी विरंगुळ््यासाठी येते. या रस्त्याजवळ असलेल्या कठड्यांवर ते सायंकाळी वेळ घालवतात. सेल्फी पॉइंट, ओपन जिम अशा सुविधांचा ते लाभ घेताना दिसतात. शिवाय सेल्फी, फोटोग्राफी, सायंकाळचा सूर्यास्त व पक्षी निरीक्षणाची संधी यामुळे हा रस्ता त्यांच्या आवडीचा रस्ता बनला आहे. महापालिकेने येथे विरंगुळा केंद्रे, उद्याने, मैदाने उभारण्याची गरज आहे. त्यासाठी आरक्षण भूखंडांचा विकास करणे आवश्यक आहे. नवीन गृहसंकुलांमध्ये बिल्डरांनीच उद्याने, जिम, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या रहिवासी त्यांचाच आधार घेत आहेत. चोळेगावात एकमेव उद्यान आहे. मात्र, त्याचीही दुरवस्था झाली आहे.होम बाबा, कचोरे टेकडीवरील अतिक्रमणकचोरे प्रभागात होम बाबा आणि कचोरे टेकड्या आहेत. या दोन्ही टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. कचोरे टेकडीवर यापूर्वी दरडी कोसळल्या आहेत. प्रशासनाने तेथील रहिवाशांना नोटिसा पाठवूनही तेथील रहिवासी घरे सोडायला तयार नाहीत. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून तेथे लोखंडी जाळी, सुरक्षा भिंत बांधावी यासाठी नगरसेविका चौधरी व राजन चौधरी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.आरक्षणांना विरोधडोंबिवली शहरात नसतील एवढी आरक्षणे ठाकुर्ली, कचोरे, खंबाळपाडा या प्रभागांमध्ये टाकण्यात आली आहेत. चोळेगावातील नागरिकांची बहुतांश जमीन पॉवर हाउस, एमआयडीसीसाठी संपादित झाली. उर्वरित जमिनीवरही केडीएमसीने आरक्षणे टाकली. त्यामुळे आमचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे येथील भूमीपूत्र व भूधारकांचे म्हणणे आहे. खंबाळपाडा प्रभागात क्रीडांगण, दोन ते तीन उद्याने, शाळा, रुग्णालये, पोलीस चौकी, महावितरण तर कचोरे येथे वाहतूक पोलीस, महापालिका वापर, मनोरंजनाचे मैदान, वाहनतळ, प्रथामिक शाळेचा विस्तार, दुकान केंद्र, महिला व बालकल्याण केंद्र, शाळा, बेघरांसाठी घरे, उद्याने, टेकडीवरील बगीचा, केडीएमटीसाठी भूखंड आरक्षित आहेत. काही जागा बांधकाम व्यावसायिकांकडून विकसित करून महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, बहुतांश जागांच्या बदल्यात जमीन मालकास टीडीआर देण्याची प्रक्रिया सुरू आहे.मोटार ट्रेनिंग ट्रॅक व अतिक्रमणच्९० फुटी रस्त्यावर म्हसोबा चौकातील टाटा पॉवर कंपनीच्या टॉवरला लागूनच अनेक खाजगी मोटार ट्रेनिंग स्कूलचालक दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देतात. शिवाय या दोन्ही रस्त्यांवर सध्या वाहतूक तुलनेत कमी असल्याने चारचाकी चालवण्याचे धडे दिले जातात.च्वर्दळ कमी असल्याने दुचाकीस्वार वेगात गाड्या हाकतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या घटनाही येथे घडल्या आहेत. सध्या दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक असले तरी ते दर्शवाणारे दिशादर्शक फलक कुठेही नाहीत. गतिरोधकांवरील पांढºया पट्ट्याही पुसट झाल्या आहेत. रस्त्यांच्याकडेला रिफ्लेक्टर, पट्टे मारले असले तरी त्यासोबतच महत्त्वाच्या चौकात झेब्रा क्रॉसिंगची नितांत गरज आहे.च्दोन्ही रस्त्यांजवळ स्थानिकांच्या जमिनींवर टायर दुरुस्ती, वाहने धुण्याची केंद्रे, चिकन शॉप, भाजी व किरकोळ विक्रेते यांनी अतिक्रमणे केली आहेत. मध्यंतरी त्यावर कारवाई होऊनही ती पुन्हा उभी राहिली आहेत.बाजारपेठेची गरजच्ठाकुर्ली आणि नवीन ठाकुर्लीमध्ये विविध प्रकारच्या बाजारपेठेची गरज आहे. सध्या किराणा, दूध डेअरी, हार्डवेअर, लॉन्ड्री, पिठाची चक्की, मोबाइल विक्री व रिचार्ज, किरकोळ भाजीविक्री, फरसाण, स्वीटमार्ट आणि सहा बँका आणि बºयापैकी त्यांची एटीएम केंद्रे आहेत. मात्र, येथे सक्षम बाजारपेठ, भाजीमंडई उभारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.च्एमआयडीसीकडे जाणाºया रस्त्यावर मंगलमूर्ती कॉम्प्लेक्समधील आरक्षित जागेवर उभारलेली भाजीमंडई वापरात आणली पाहिजे. खंबाळपाड्यात मॉडेल कॉलेजसमोर व ठाकुर्लीतील महिला समिती शाळेमागे भरणाºया आठवडा बाजाराला अधिकृत स्वरूप देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतकºयांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेतंर्गत शेतकरी आठवडा बाजार सुरू केला पाहिजे.प्रदूषणामुळे कोंडतोय श्वासघरडा सर्कल ते टाटा पॉवर लाइन या रस्त्याला लागूनच एमआयडीसी फेज-१ आहे. तेथील रासायनिक, टेकास्टाइल व अन्य कारखान्यांमधील सांडपाणी थेट खाडीला जाऊन मिळते. कारखान्यांमधील धुराच्या उग्र दर्पामुळे खंबाळपाडा परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत.सावित्रीबाई फुले कलामंदिरासमोरील सीईटीपी केंद्रात कंपन्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया होते. हे पाणी थेट खाडीत सोडण्यासाठी जलवाहिनी टाकली आहे. मात्र, ही जलवाहिनी खाडीत आतपर्यंत न सोडता समांतर रस्त्यालगतच्या नाल्यातच सोडण्यात आली आहे.अनेक कंपन्या त्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच गटारे, नाल्यात सोडतात. त्याच्या दर्पामुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.
ठाकुर्लीला जोडण्यासाठी हव्यात वाहतुकीच्या सोयी : परिवहन सेवेच्या फेऱ्या नावालाच, रिक्षासाठीही ताटकळण्याची येतेय वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:28 AM