डोंबिवली : दीड वर्ष कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. अनेक ठिकाणचे भाडे वाढले असून गाड्यांची संख्याही वाढली आहे. गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ झाली असून कोकणात जाण्यासाठीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असल्याने सिंधुदुर्ग, मालवणला जाण्यासाठी दुप्पट भाडे ट्रॅव्हल्स चालकांनी आकारल्याचे निदर्शनास आले.
जळगाव, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदी भागात जाण्यासाठीदेखील गतवर्षीच्या तुलनेत १५० ते २०० रुपये भाडे जास्त आकारले आहे. डिझेल भाववाढीचे कारण पुढे करत व्यावसायिकांनी गणेशोत्सवातही संधी सोडली नसून त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यामुळे एकीकडे प्रवास करायला मिळाल्याचे समाधान असले तरी, महागाईची झळ बसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
-----------
या मार्गावर सर्वाधिक टॅव्हल्स
मुंबई - सिंधुदुर्ग
नवी मुंबई - कोल्हापूर
नवी मुंबई - मालवण
पनवेल - सांगली
डोंबिवली - जळगाव
डोंबिवली - कोल्हापूर
------^^^^--------------
भाडे वाढले
आधीचे सध्याचे
डोंबिवली सिंधुदुर्ग १५००। १८००
डोंबिवली जळगाव ५००। ७००
पनवेल मालवण। १५०० । २०००
------------------------
३) दीड, दोन वर्षानंतर आता कुठे बरे दिवस यायला लागले आहेत. गणेशोत्सव महत्त्वाचा सण असून कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांना खूप मागणी आहे. आता कोकणात गेलेले प्रवासी परत माघारी फिरतील. त्यामुळे ते येतानादेखील व्यवसाय तेजीत असेल. दीड वर्ष गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता.
- ट्रॅव्हल व्यावसायिक
--/--------
केवळ मोठ्या बस नव्हे तर कारलासुद्धा मागणी होती. त्यामुळे गणेशोत्सव निमित्ताने टूर्स ट्रॅव्हल्स व्यवसायाला गती मिळाली आहे. कार व्यवसायातदेखील इंधन दरवाढीमुळे किमी मागे २ रुपये वाढवावे लागले. प्रवासीदेखील अडचण समजून घेत असल्याने भाडे मिळत आहेत.
- गौरव खत्री, टूर्स कार मालक व्यावसायिक
---/-------------
ट्रेनने जाणे परवडत असले तरी वेळेत तिकीट मिळणे हे आव्हान असते. त्यामुळे खासगी बसने जावे लागते. खासगी बसला सणासुदीत खूप मागणी असते. कोकणात जायला तर एरव्ही ५०० रुपये लागतात, पण सणाला मात्र तेच भाडे तिपटीने आकारले जाते. प्रवाशांना गरज असते. त्यामुळे जास्तीचे भाडे भरून जावे लागते.
- हरिश्चंद्र गोलतकर, प्रवासी