ठाणे : कर चुकवल्याबद्दल कारवाईची धमकी देऊन अमेरिकेतील नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये वसई येथील एका आरोपीस मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आरोपी बोगस कॉल सेंटरचा व्यवस्थापक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कर चुकवणाºया अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटरनल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्यानावे संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. याबाबत ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्यात एक आणि नयानगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणी आतापर्यंत ७० पेक्षा जास्त आरोपींना अटक करून ३९७ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी याप्रकरणी वसई येथील तपेश गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. बोगस कॉल सेंटरमध्ये तो फ्लोअर मॅनेजर म्हणून काम करायचा. कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी कॉलद्वारे धमकावणारे कॉल आॅपरेटर्स, कॉल सेंटर चालवणारे मुख्य आरोपी आणि या टोळीशी संबंधित प्रत्येक घटकासोबत समन्वय ठेवण्याचे काम तपेश गुप्ता करायचा. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लगेच फरार झाला होता. गेली दोन वर्षे पोलीस त्याचा शोध घेत होते.या टोळीतील आरोपी कर चुकवल्याबद्दल अमेरिकेतील नागरिकांना कारवाईची धमकी द्यायचे. त्यानंतर, तडजोड करून अमेरिकन नागरिकांकडून आयट्यून कार्ड्सच्या माध्यमातून ते खंडणी उकळायचे. त्यासाठी आरोपींचे अमेरिकेतही साथीदार होते. या साथीदारांकडून भारतात येणारा पैसा तपेश गुप्ताच्या नावाने यायचा. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना या मुद्द्यावर ठोस पुरावे मिळाले होते. न्यायालयाने त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.शॅगीच्या मर्जीतील साथीदारबोगस कॉल सेंटरचा महत्त्वाचा कारभार तपेश गुप्ता सांभाळायचा. तो मूळचा गुजरातचा असून या प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी हादेखील मूळचा गुजरातचाच आहे.तपेश हा शॅगीच्या जवळच्या साथीदारांपैकी एक आहे. शॅगीला पोलिसांनी एप्रिल २०१७ मध्ये अटक केली होती. तपेश मात्र दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता.बोगस कॉल सेंटरमध्ये तपेश गुप्ता हा फ्लोअर मॅनेजर म्हणून कामाला होता. या प्रकरणातील अनेक आरोपींच्या जबाबामध्ये त्याचा संदर्भ आला होता. कॉल सेंटरमधील पैशांच्या व्यवहारातही त्याचा सहभाग आढळून आला आहे. त्याने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे.- मुकुंद हातोटे, सहायक पोलीस आयुक्त, ठाणे
खंडणीखोर कॉल सेंटरचा व्यवस्थापक अखेर चतुर्भुज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 6:11 AM