शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
2
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
3
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
4
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
5
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
6
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
7
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
9
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
10
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
11
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
12
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
13
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
14
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
15
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
16
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
17
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
18
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
19
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
20
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम

आदिवासींना करटोलींचा आधार

By admin | Published: August 17, 2016 2:24 AM

आयुर्वेदिक महत्त्व आणि खायला चविष्ट असणाऱ्या करटोलींना भिवंडी ग्रामीण भागासह शहरात मोठी मागणी आहे. ही भाजी किलोला २५० रुपये दराने विकली जात आहे.

अनगाव : आयुर्वेदिक महत्त्व आणि खायला चविष्ट असणाऱ्या करटोलींना भिवंडी ग्रामीण भागासह शहरात मोठी मागणी आहे. ही भाजी किलोला २५० रुपये दराने विकली जात आहे.रानभाज्यांना आयुर्वेदिक महत्त्व असल्याने याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सध्या आवक कमी असल्याने या भाजीचे दर वाढले असले तरी ग्राहकांची इतर भाज्यांपेक्षा करटोलींना अधिक पसंती आहे. तालुक्यातील अंबाडी, पडघा, खारबाव, अनगाव, दाभाडसह वंजारपट्टीनाका, मंडई, धामणकरनाका येथे, तर मुंबई-नाशिक महामार्गावर खडवली-वांद्रे, डोहळे, कोशिंबी या ठिकाणी करटोलींची विक्री होते. ग्राहक रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या आदिवासी महिलांकडून या रानभाज्या विकत घेतात. करटोली पावसाळ्यात येत असली तरी श्रावणात तिची मागणी वाढते. त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळतो. भरपावसात करटोली शोधण्यासाठी अनेकदा आदिवासींना रानात जावे लागते. बाहेरून हिरवीगार दिसणारी काटेरी असलेली भाजी आदिवासी कुटुंबांचा पावसाच्या काळात आधार बनते. कल्याण, ठाणे, नवी मुंबई येथील व्यापारी येऊन ही करटोली खरेदी करतात.