- नारायण शेट्टी
शहापूर- आज आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्रमजीवी संघटनेतर्फे शहापुरातून मोटार सायकलची रॅली काढण्यात आली. शहापूर पंचायत समिती जवळील शिवाजी महाराजांच्या स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या नंतर आदिवासी क्रांतिवीर रागोजी भांगरे , बिरसा मुंडा, आणि नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पंचयात समितीच्या आवारात "बिरसा मुंडा करे पुकार.....उल गुलान...उल गुलान.....!जय आदिवासी, जय भारत..! अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आदिवासी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करून आपला जल्लोष व्यक्त केला त्याच बरोबर सामूहिक नृत्याच्या माध्यमातून आपल्या रूढी आणि पद्धतीचे दर्शन घडवले.
पंचयात समितीच्या आवारात "बिरसा मुंडा करे पुकार....,कुठेच अनुचित प्रकार न घडता शांततेने आदिवासी दिन साजरा करण्यात आला. श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके यांनी आदिवासी दिनाची माहिती देऊन प्रत्येकांने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोविड प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी असे आवाहन आदिवासी बांधवांना केले. त्याला सर्वांनी प्रतिसाद देत आम्ही कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेऊ अशी शपथ घेतली.
आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अविनाश थोरात, विविध राजकीय पक्ष आणि संघटनेने आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. कुठेही अनुचित प्रकार न घडता आदिवासी दिन शांततेत आणि उत्साहात पार पडला.