शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:09 AM

अग्निशमन केंद्राच्या वास्तू झाल्या जीर्ण : दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका परिसरात बचाव कार्यासाठी गेलेले केडीएमसीतील अग्निशमन दलातील प्रमोद वाघचौडे आणि अनंत शेलार या दोन जवानांचा विहिरीतील विषारी वायुमूळे मृत्यू झाल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. या दोघांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. अग्निशमन केंद्राच्या वास्तूही सुस्थितीत नाहीत. त्या जीर्ण झाल्याने येथील जवानांचा जीव टांगणीला लागला आहे.

मंजूर पदे आणि कार्यरत मनुष्यबळ, यातील तफावतीमुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची होणारी परवड आणि अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत असताना शहरात घडण्याºया दुर्घटनांमध्ये जवानांचे बळीही गेल्याचे मागील वर्षी पाहायला मिळाले. विहीर दुर्घटनेत वाघचौडे आणि शेलार यांचा बळी गेल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबरला मध्यरात्री चायनीज खाद्यपदार्थांच्या दुकानाला लागलेली आग विझविताना लीडिंग फायरमन जगन आमले यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनानंतरही जवानांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही अग्निशमन दलातील जवान सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत असताना दुसरीकडे अशा दुर्घटनेवेळी धावून जाणाºया जवानांचे जीवही धोक्यात आहेत. डोंबिवलीतील अग्निशमन केंद्रातील छताला असलेल्या प्लास्टरची पडझड झाल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच वावरावे लागत आहे. या केंद्रात बहुतांश ठिकाणी भिंतीमधून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणचे प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. यासंदर्भात ९ जून २०१९ ला मुख्य अग्निशमन अधिकारी, संबंधित खात्याचे उपायुक्त आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.दुसरीकडे पश्चिमेतील आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक अवस्थेत असलेली इमारत दुरुस्त करावी, यासंदर्भात तीन वर्षांपासून नगरसेवक मोहन उगले यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कामाची फाइलही बनवली, पण अंमलबजावणीच नाही. या धोकादायक अवस्थेतील केंद्रातील मुख्यालय चिकणघर परिसरात हलवले आहे. पण केंद्र आधारवाडीला जैसे थे ठेवले आहे.लवकरच कार्यवाही होईलआधारवाडी येथील केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाणार आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तळमजल्यावर अग्निशमन केंद्राची वाहने, पहिल्या मजल्यावर संबंधित विभागाचे मुख्य कार्यालय तर दुसºया व तिसºया मजल्यावर ‘क’ प्रभागाचे कार्यालय असेल, असे नियोजन आहे. डोंबिवली केंद्रच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवला आहे. त्याबाबतही कार्यवाही होईल, असे केडीएमसीचे मुख्य अग्शिमन अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका