ठाणे : शहीद वीर जवान नेहमी स्मरणात राहण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे पालिका प्रभाग क्र. १२ सिद्धेश्वर तलाव परिसरात २०१० मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली. या उद्यानात दरवर्षीप्रमाणे यंदाही देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर नृत्य सादर झाले.
यावेळी भारतीय वायुसेनेचे वींग कमांडर शिवराज सिंग , भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त कॅप्टन निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, आयोजक खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख मिलिंद मोरे, ठाणे शहर समन्वयक राम काळे, महिला उपशहर संघटक मंजिरी धमाले, कुंदा दळवी, युवा सेना जिल्हा निरीक्षक अर्जुन दाबी, शाखाप्रमुख धोंडू मोरे, तानाजी कदम, हिंदी भाषिक शिवसेना संघटक प्रभाकर सिंग, शिवसेना संघटक विनय शुक्ला, सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, शिवसेना, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.