लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शहरात चोरी तसेच वाहनांची चोरी करणाºया अटक शबाब सय्यद (३७, रा. कुर्ला, मुंबई), खामोश छेडा (२१, रा. ठाणे) आणि आकाश मारके (२६, रा. ठाणे) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली. त्यांच्याकडून चार लाख ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शहरातील वाढत्या चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्हयांच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाणेनगर पोलिसांना दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून परिणामकारक गस्त आणि नागरिकांमध्ये जागृकता सुरु केली होती. दरम्यान, ८ मार्च २०२१ रोजी मार्केट परिसरातील अग्निशमन केंद्रासमोर उभी केलेली एक रिक्षा चोरीस गेली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने एका सीसीटीव्हीच्या आधारे ९ मार्च रोजी शबाब हुसेन रिझवी सय्यद यास कौसा, मुंब्रा येथून अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने दोन रिक्षा चोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील या दोन्ही रिक्षा हस्तगत केल्या आहेत. अन्य एका घटनेत २ मार्च रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल दाखल झाली होती. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने खामोश पोपटलाल छेडा या चोरटयाला ८ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीमध्ये त्याने ४२ हजारांची मोटारसायकल चोरल्याची कबूली दिली. त्याच्या ताब्यातून ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. तर खारटन रोड येथील एका चोरीच्या गुन्हयात आकाश मारके याला उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ८० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट, ४० हजारांची सोन्याची अंगठी असा एक लाख ६४ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
ठाण्यात वाहनांसह घरात चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 6:53 PM
शहरात चोरी तसेच वाहनांची चोरी करणाºया अटक शबाब सय्यद (३७, रा. कुर्ला, मुंबई), खामोश छेडा (२१, रा. ठाणे) आणि आकाश मारके (२६, रा. ठाणे) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली.
ठळक मुद्दे ठाणेनगर पोलिसांची कार्यवाही चार लाख ५६ हजारांची वाहने जप्त