- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतपर्यंत सुमारे तीन हजार मिमी जादा पावसाची नोंद झाली असून मंगळवारी सायंकाळी ४ वाजता तानसा धरण १०० टक्के भरले, त्या आधी मोडकसागर ओसंडून वाहू लागले. आहे. तर अन्य धरणांमध्ये तिप्पट पाणीसाठा तयार झाला आहे.संततधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोड पाणी खाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबली. उल्हासनगरजवळ वालधुनी नदीच्या पुराचे काठावरील झोपड्यांमध्ये पाणी शिरले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील झाडाची फांदी तुटली, शहरात सहा झाडे उन्मळून पडले, तीन मोठे वृक्ष झुकले आहेत. एक भिंती पडली, तर नाल्यावरील कंपाऊंड वाहून गेले, एक कंपाउंड पडल्याच्या स्थितीत आहे. पाणलोट क्षेत्रासह शहरी व निवासी भागात ही पाऊस जोरदार पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १००२८ मिमी. पाऊस पडला, मागील वर्षी या दिवशी केवळ ७३८६.३० मिमी पाऊस पडला होता. यंदा सरासरी १४३२.६१ मीमी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस उल्हासनगरला १५०४ मीमी, मुरबाडला १४९३, ठाण्याला १४६९, कल्याणला १४५६, भिवंडीला १४१८, शहापूरला १४०७ तर अंबरनाथला सर्वात कमी १२८१ मीमी पाऊस झाला.शहरात मुसळधार पाऊस- २४ तासांपासून ठाण्यात सातत्याने बरसणाऱ्या पावसाचा जोर मंगळवार पहाटेपासून पुन्हा वाढला. मुसळधार पावसामुळे भिंत तसेच वृक्ष उन्मळून पडण्याच्या किरकोळ घटना शहरात घडल्या. विशेष म्हणजे, पाऊस असला तरी शहरातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु होती. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. संपूर्ण ठाणे शहरामध्ये गेल्या चोवीस तासात ११२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे चोवीस तासांत वेगवेगळ्या २१ तक्रारी आल्या. त्यात कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागातील नाल्याची भिंत तसेच नौपाड्यातील वैभव सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याच्या तक्रारींचा समावेश होता. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.