लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येऊर येथील ठाणे महापालिका शाळेच्या बांधकामासाठी सिमेंटची वाहतूक करणाºया ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा मिक्सर ट्रक उपवन जवळील येऊरच्या प्रवेशद्वाराजवळ पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातात चालक असीम (३५) हा ट्रकमध्ये अडकला होता. सुदैवाने ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या मदतीने त्याला सुखरुप बाहेर काढले.गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेती आणि सिमेंटचा माल खाली करुन हा मिक्सर ट्रक येऊर येथून ठाण्याच्या दिशेने जात होता. येऊर येथे पालिकेच्या शाळा क्रमांक ६५ चे बांधकाम सुरु असून ते शेवटच्या टप्यात आहे. त्यामुळे या ट्रकचीही ११ जून रोजी ही शेवटची फेरी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे एका भिंतीला आदळून ट्रक पलटी झाला. चालक असीम हा स्टेअरिंगमध्ये अडकल्यामुळे तो बाहेर पडू शकला नाही. त्यातच तो जखमी झाला. एका क्रेनच्या तसेच कटरच्या मदतीने ठाणे अग्निशमन दल आणि वर्तकनगर पोलिसांनी त्याला अर्ध्या तासाने सुखरुप बाहेर काढले. उपचारासाठी त्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष घाटेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ठाण्यात येऊरजवळ ट्रक उलटला: चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 9:11 PM
सिमेंटची वाहतूक करणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने उपवन जवळील येऊरच्या प्रवेशद्वाराजवळ हा ट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाची मोठया कौशल्याने ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या मदतीने सुटका केली.
ठळक मुद्दे ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाची ठाणे अग्निशमन दलाने केली सुखरुप सुटकाब्रेक फेल झाल्यामुळे अपघाताची शक्यता