लोकमत न्यूज नेटवर्क, खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मुंबई मार्गिकेवर तिसऱ्या लेनवर ट्रकला खासगी बसने पाठीमागून धडक दिली. बसचालक व सहचालकासह आठ जण गंभीर, इतर १८ प्रवासी जखमी झाले. त्यांना एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
ट्रकचालक महेश भीम रेड्डी मुसाने (वय ३१. रा. गडीगोंडगाव, ता. बसव कल्याण) याने ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने तो रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा केला. पाठीमागून येणाऱ्या खासगी बसवरील चालक बालाजी सूर्यवंशी (वय ४१, रा. खराबवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. कोल्हापूर येथून ही बस मुंबईत येत होती.
अपघातातील गंभीर जखमीबालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक), संकेत सत्तपा घारे (सहचालक), मनीषा भोसले, सुनीता तराळ, अभिजित दिंडे, सरिता शिंदे, संदीप मोगे, सोनाक्षी कांबळे.
जखमींमध्ये सोमय्या कॉलेजच्या महिला खेळाडूया बसमध्ये कोल्हापूर येथे फुटबॉल स्पर्धेसाठी गेलेला मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाचा मुलींचा संघ व प्रशिक्षक होते. ते ट्रॉफी जिंकून मुंबईत परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला. यात महिला खेळाडू जखमी झाल्या आहेत.