---
* प्रतिक्रिया-
माहिती व सेवा सुविधा न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना ६ महिने ते २ वर्षे शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद केली आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे निदान झालेल्या व औषधोपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला कळविणे व क्षयरुग्णांना सेवासुविधा पुरविणे बंधनकारक आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण मोहीम जुलै २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत राबविण्यात येत आहे. तरी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य द्यावे. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन क्षयरोगाचे उच्चाटन करावे. ही वेळ आहे क्षयरोग बाधितांपर्यंत पोहोचण्याची, हीच वेळ आहे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले आहे.
- डॉ. गीता काकडे
ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी,
जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे ग्रामीण.
----------
१) जिल्ह्यातील क्षयरोगी - २२८१
२) भत्ता किती जणांना मिळतो - १४६२ रुग्णांना (६२ टक्के) डीबीटीचा लाभ
३) न मिळणाऱ्यांचे प्रमाण (टक्क्यांत) - ८२१