शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नल बंद करा

By admin | Published: July 17, 2017 1:12 AM

घोडबंदरकडे येजा करण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील सिग्नलमुळे मोठा खोळंबा होतो, हे सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदरकडे येजा करण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील सिग्नलमुळे मोठा खोळंबा होतो, हे सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. सकाळ, दुपार, रात्री या ठिकाणी वाहतुकीला मोठा ब्रेक लागतो. यामुळे तो बंद करावा, अशा आशयाचे पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहे. परंतु, अद्यापही त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात आलेला नाही.घोडबंदर मार्ग हा चारपदरी झाल्यानंतर येथील वाहतूककोंडी सुटेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आहे. त्यामुळे या भागात चार ठिकाणी टप्प्याटप्प्याने उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ कोंडी फोडण्यासाठी याची मदत झाली. परंतु, मुंबईच्या दिशेने जाताना आणि मुंबईहून येताना कापूरबावडी येथील उड्डाणपूल सुरू झाला आणि वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली. मुळात येथील उड्डाणपूल तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे उतरवण्याची घोडचूक एमएसआरडीसीकडून झाली. तो पूल पुढे विहंग हॉटेलपुढे उतरवणे गरजेचे असताना तो सिग्नलच्या आधीच खाली उतरवण्यात आला. तो कोणी खाली उतरवण्याचे ‘प्रताप’ कुणी केले, याचे आजही कोडे आहे. परंतु, त्याचे भोग आता वाहनचालकांना भोगावे लागत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि नाशिककडून येणारी वाहतूक एकाच वेळेस वेगात येऊन या ठिकाणी असलेल्या सिग्नलजवळून येऊन थांबते. त्यामुळे थेट उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी दीड वर्षापूर्वी येथील सिग्नल ठरावीक वेळासाठी बंद ठेवून विद्यापीठाच्या आतील बाजूने येणारी आणि घोडबंदरकडून येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. परंतु, कालांतराने पुन्हा तो संपूर्ण वेळेत सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे या भागात आता दोन्ही बाजंूनी लांबचलांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा म्हणून ही कोंडी फोडण्यासाठी हा सिग्नल बंद करण्याची मागणी महापौरांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.