- जनार्दन भेरे लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात तांदूळ, ज्वारी, बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. भाताला एक हजार ते १२०० रुपये, नागलीला ४ हजार १०० रुपये, तर वरई ४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे.
खरीप हंगामातील भात, नागली, वरई यांना चांगला भाव मिळत नाही. शेवटी शेतकऱ्यांना अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते. आता हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यात नांगरणीबरोबरच भात बियाण्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या शेतमालाची मागणी बाजारात वाढली आहे. परंतु, आवक घटल्याने मिळेल त्या किमतीला शेतकऱ्यांना भात विकावा लागत आहे.
भाताला सर्वाधिक भावभाताला सर्वाधिक भाव भात खरेदी केंद्राकडून मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या भात खरेदी करत नसल्याने व शासकीय भात खरेदी केंद्र बंद झाल्याने खासगी दुकानदार आता अधिक कमी भावाने भात खरेदी करू लागले आहेत. भात १ हजार २०० रुपयांना विकला जात आहे.
भाव आणखी गडगडणार खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे भात भिजल्याने मोठी घट झाली आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. हा भाव हजार रुपये ते तेराशे क्विंटलवर जाऊन स्थिर राहण्याची शक्यता आहे. खरीप व रब्बी हंगामातील अवकाळी अतिवृष्टीने उत्पादनात घट झाली. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे आवश्यक भावात वाढ झाली आहे. नवीन भात बाजारात येईपर्यंत भावात चढउतार राहण्याची शक्यता आहे. किंवा अजूनही भाताचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
भाताचे उत्पादन जास्त झालेल्या शेतकऱ्यांनी सध्या भाताची विक्री सुरू केली आहे. सध्या बाजारात भात, नागली, बाजरीची आवक जास्त असल्याचे दिसून येते. -योगेश सोळंकी, कृषी पर्यवेक्षक.
शेतकऱ्यांनी भाव कमी असल्याने भाताची विक्री करण्याऐवजी बियाणे म्हणून घरात ठेवले आहे. - प्रवीण भेरे, शेतकरी.