शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कल्याण-डोंबिवलीतील अडीच हजार नागरिकांनी काढले परदेशाचे लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:25 AM

स्टार ८९६ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : जिल्ह्यातील शैक्षणिक-सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवली आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळख ...

स्टार ८९६

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : जिल्ह्यातील शैक्षणिक-सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवली आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कल्याणमधून परदेशी शिक्षण व नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातील अनेक जण कायमचे परदेशात स्थायिक झाले आहेत. परदेशात गेल्यावर दळवळणासाठी स्वत:चे वाहन असावे लागते. त्याकरिता इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असावे लागते. हे लायसन्स काढण्याची सुविधा स्थानिक आरटीओ कार्यालयात उपलब्ध आहे. कल्याण-डोंबिवलीतील दोन हजार ५५० नागरिकांनी २०११ ते जून २०२१ पर्यंत हे लायसन्स काढल्याची माहिती कल्याण आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.

मुंबईच्या शेजारचा जिल्हा असलेल्या ठाण्यात मागील काही वर्षांत आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहेत. या कंपन्यांचे बहुतांश प्रोजेक्ट्स हे परदेशातील कंपन्या किंवा तेथील क्लायंट्ससाठी सुरू असतात. त्यामुळे या प्रोजेक्ट्सकरिता परदेशी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय सेवांशी निगडित कामासाठी अनेक जण परदेशात जात असतात. त्याचबरोबर अमेरिका, इंग्लंड, जर्मनी तसेच आशियाई देशांमध्ये उच्च शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अलीकडे वाढली आहे. या नागरिकांना तेथे गेल्यावर दळवळणासाठी स्वत:चे वाहन घ्यावे लागले. त्यामुळे त्यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स त्यांना काढावे लागते. त्याकरिता आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच हे लायसन्स दिले जाते. विशेष म्हणजे परदेशात वाहतुकीचे नियम खूप कडक असल्याने ते माहीत करून घेऊन त्यानुसार वाहन चालवणे गरजेचे असल्याचे जाणकारांनी सांगितले.

किती जणांनी काढले इंटरनॅशनल लर्निंग लायसन्स? (ग्राफ)

२०११ - १८१

२०१२ - १७०

२०१३ - १७६

२०१४ - १७४

२०१५ - १७९

२०१६ - १९५

२०१७ - २६५

२०१८ - ३५५

२०१९ - ४१०

२०२० - २६५

२०२१ (जूनपर्यंत) - १८०

------------

मुदत एक वर्षाचीच

परदेशी गेल्यानंतर तेथे जाऊन वाहन चालवायचे असल्यास इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक वर्षाचीच मुदत असते. त्यानंतर ही मुदत वाढवून घ्यावी लागते. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा परदेशात जायचे असते तेव्हा संबंधित राज्यातील जिल्ह्याच्या आरटीओ केंद्रात स्वतः व्यक्तीशः हजर राहावे लागते. त्यानंतर मुदतवाढ करायची झाल्यास ऑनलाइन अर्जाद्वारे करता येते. ती सुविधा, पर्याय उपलब्ध आहे.

------------

तुम्हालाही काढायचेय इंटरनॅशनल लायसन्स?

- प्रामुख्याने व्हिसा, पासपोर्ट असणे गरजेचे आहे.

- परदेशात जाण्याचा उद्देश काय, हे अर्जात नमूद करावे लागते.

- परदेशात गेल्यावर वाहन सुविधा कशी मिळेल, हे स्पष्ट करावे लागते.

- परदेशात कामानिमित्त जाणार असल्यास कंपनीचे पत्र मिळाले असल्यास ते जोडणे आवश्यक आहे.

------------

कोट

परदेशी जाणाऱ्या नागरिकांना तेथे दुचाकी, चारचाकी चालवण्यासाठी परवाना हवा असल्यास तो भारतातील आरटीओ कार्यालयांतून काढून देण्याची सुविधा आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता अर्जदारांनी करावी लागते. पहिल्या वेळेस आरटीओमध्ये जावे लागते, त्यानंतर पुन्हा थेट लायसन्स संबंधितांना ऑनलाइन अर्जाद्वारे तेथील कंपनीच्या पत्त्यावर मिळते. मात्र त्यासाठी अर्ज करताना सावधपणे तसे नमूद करावे लागते. याकडे नागरिकांनी लक्ष द्यायला हवे. नव्या धोरण बदलात ती सुविधा देण्यात आली आहे.

- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.

------------------