कल्याण : काळ्या अमेरिकन डॉलरच्या नोटा साफ करून देण्याच्या बहाण्याने कल्याणमधील एका दाम्पत्याची दोन कोटी ५३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. अमृता धामणकर यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे पती स्वप्निल वरिष्ठ व्हिसा अधिकारी आहेत. मरियम खुर्शीद नावाच्या महिलेशी त्यांची ‘फेसबुक’द्वारे ओळख झाली. आपण अमेरिकेत राहत असून माझ्या १२ वर्षांच्या मुलाला भारतात स्थायिक होण्याची इच्छा आहे. त्यासाठी बचत केलेले १८ लाख अमेरिकन डॉलर भारतात आणायचे आहेत, त्यासाठी मदत करावी, अशी विनंती तिने स्वप्निल यांना केली. मरियमने एक अमेरिकन डॉलरने भरलेला खोका पाठवित असून, तो ताब्यात घ्यावा असे सांगितले. त्यानुसार आॅगस्टमध्ये स्वप्निल यांना एका व्यक्तीने दिल्लीतून कस्टम आॅफिसर बोलत असल्याचे सांगत कस्टम टॅक्स दोन लाख, अॅन्टी टेरेरिस्ट कोडसाठी चार लाख, ट्रान्सपोर्ट ८० हजार असे पैसे आॅनलाइनद्वारे भरण्यास सांगितले. त्यानुसार स्वप्निल यांनी पैसे भरले.सप्टेंबरमध्ये जॉनस कॉस्टन याने डॉलरने भरलेला बॉक्स मुंबईत आणल्याचे सांगितले. कल्याणला घरी आल्यावर बॉक्स उघडला असता त्यामध्ये काचेची बॉटल आणि १६ काळ्या रंगाचे नोटाचे (अमेरिकन डॉलर) बंडल होते. परंतु, बॉक्समधील बाटली फुटलेल्या अवस्थेत होती. कॉस्टनने याच बाटलीतील द्रव्याने या काळ््या नोटा साफ करणार होतो. आता तुम्ही अशी बॉटल विकत घ्या, असे सांगत फसवणूक केली.>‘यांनी’ही घातला गंडात्याचबरोबर जॉर्ज कारा, डॉक्टर इस्लाम, खालू टेक्निशियन, मिस्टर केन, डेव्हिड मार्कस यांनीही नोटा साफ करण्याची मशीन्स, चार्जिंग, सोलुशनच्या आॅनलाइन खरेदीच्या बहाण्याने स्वप्निल यांच्याकडून लाखो रुपये घेतले. अशा प्रकारे अडीच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
दाम्पत्याला घातला अडीच कोटींचा गंडा, सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:03 AM