शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

दुपटीने विमा परतावा देण्याचे आमिष, साडेचार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 9:35 PM

दुपटीने विमा परतावा देण्याचे अमिष दाखवून फिनिक्स रेलकॉन कंपनीचे चंद्रकांत इंगवले यांनी व त्यांच्या साथीदारांनी भिवंडीतील फुरकान अन्सारी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांची सुमारे चार कोटी ४५ लाख ७८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

ठाणे : दुपटीने विमा परतावा देण्याचे अमिष दाखवून फिनिक्स रेलकॉन कंपनीचे चंद्रकांत इंगवले यांनी व त्यांच्या साथीदारांनी भिवंडीतील फुरकान अन्सारी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांची सुमारे चार कोटी ४५ लाख ७८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.इंगवले याने नौपाडयातील शिवाजीनगर येथे फिनिक्स नेलकॉन प्रा. लि. या कंपनीचे २००८ मध्ये कार्यालय थाटले. या ठिकाणी काही कर्मचा-यांची भरती करुन त्यांच्यामार्फतच त्याने अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातला. या कंपनीमार्फत त्यांनी आकर्षक विमा परतावा देण्याच्या योजनेचे अमिष दाखविले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर पाच आणि सात वर्ष मुदतीवर ठेवी ठेवल्यास मुदतीअंती दुप्पट रकमेचा आणि आकर्षक विमा देण्याचे प्रलोभन दाखविले. याच अमिषापोटी अन्सारी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांकडून त्यांनी ५० हजार, एक लाख, दहा हजार, २५ हजार अशा वेगवेगळया रकमा २००८ ते २०१७ या नऊ वर्षात जमा केल्या. या रकमा जमा करुनही त्यावरील व्याज किंवा गुंतविलेली मुद्दलही त्यांना परत केली नाही.करोडो रुपयांची रोकड परत करण्याऐवजी तिचा इंगवले आणि त्याच्या साथीदारांनी अपहार केला. गुंतवणूकदारांनी विचारपूस करण्यास सुरुवात केल्यानंतर या कंपनीतील कर्मचा-यांनी योजना चांगली आहे, परंतु, कंपनीत काही आर्थिक समस्या असल्यामुळे पेमेंट करण्यास उशिर होत असल्याचे कारण सांगण्यास सुरुवात केली. मुळात, इंगवले याने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन फिनीक्स रेलकॉनमध्ये वेगवेगळ्या पदांवर अधिकारी आणि कर्मचा-यांची भरती केली. याच कर्मचा-यांकडून तो लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. कालांतराने गुंतवणूकदारांनी पाठपुरावा केल्यामुळे त्याने ठाण्यातील कार्यालय बंद करुन आपल्या साथीदारांसह पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अन्सारी यांच्यासह अनेकांनी २६ सप्टेंबर २०१७ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. इंगवले आणि त्याच्या टोळीने ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच उत्तर प्रदेशातील गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांच्या रकमा उकळल्या आहेत. या टोळीचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.