लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून गणेश गोरे (२४, रा. लुईसवाडी, ठाणे) याच्यावर काचेच्या बॉटलने तसेच लाकडी बांबूने खूनी हल्ला करणाºया दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.लुईसवाडीतील रहिवाशी गणेश गोरे आणि त्याचा भाऊ रोहित तसेच त्याचा मित्र प्रथमेश झगडे, रोहन कालेल हे वारडन कंपनीतील मोकळया जागेमध्ये ९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी मोनू कान्या, उमेश सरोज, युनूस (रिक्षावाला) आणि आशुतोष दगडे हे त्याठिकाणी आले. त्यांच्यात ८ जानेवारी रोजी झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन मोनू याने गणेश गोरे बसलेल्या दिशेने दगड फेकून मारला. त्यावेळी तो दगड गणेश याने चुकविला. त्यानंतर ते सर्वजण गणेशच्या दिशेने धावत आले. त्यावेळी आशुतोष याने गोरे याला त्याच्या हातातील दारुच्या एका रिकाम्या बॉटलने त्याच्या डाव्या कानाच्या डोक्याच्या वरच्या बाजूला मारली. ही बॉटल फुुटून गोरे याच्या डोक्याला दुखापत झाली. आरोपी उमेश सरोज उर्फ अंबू यानेही त्याच्या हातातील रिकामी बॉटल गोरे याच्या डोक्यात मारली. त्याचवेळी मोनू कान्या याने आणि युनूस रिक्षावाला यांनी लाकडी बांबूने गणेश याच्या पाठीवर आणि पायाच्या पोटरीवर जबर मारहाण केली. याप्रकरणी गणेश याने तक्रार दिल्यानंतर यातील उमेश आणि आश्ुतोष या दोघान्ाां वरिष्ठ पोलीस निरीक्षक दतात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने रविवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.