कल्याण : हुक्का पार्लरमध्ये येणाºया गाड्या घरासमोर उभ्या राहत असल्याने त्याला विरोध करणारा रिक्षाचालक रियाज शेख यावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी साजीद सय्यद हमीद आणि इरफान जमल्लुद्दीन शेख यांना अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे. आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.नेतिवलीच्या श्रीकृष्णनगर परिसरात रियाज शेख राहत होता. तो राहत असलेल्या भागात एक हुक्का पार्लर सुरू होते. त्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पार्र्किंग होत असल्याने रियाजने याला आक्षेप घेतला होता. यावरूनच शुक्र वारी त्याचा साजीद आणि शाहरूखसोबत वाद झाला. यानंतर, रियाज टिळकनगर पोलीस ठाण्यात गेला. मात्र, पोलिसांनी त्याची योग्य दखल न घेतल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांत दिलेल्या तक्र ारीचा राग मनात धरून शनिवारी शाहरूख शेख, जीवा भोसले, पापा पठाण आणि इरफान शेख यांनी रियाजवर हल्ला केला. तर, साजीद याने त्याच्यावर गोळी झाडली. यात रियाजचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी साजीद हमीद आणि इरफान शेख याला अटक केली असून पापा पठाण, जीवा भोसले आणि शाहरूख शेख यांचा शोध सुरू आहे.पार्लरला विरोध केल्यामुळेच रियाजची हत्या झाल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. तर, येथे हुक्का पार्लर नसून हॉटेल बांधण्याचे काम सुरू असल्याचे वपोनि शिवाजी धुमाळ यांनी सांगितले.
हत्येप्रकरणी दोघांना अटक; तिघे फरार: हुक्का पार्लर प्रकरणातून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:27 AM