जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रेल्वेच्या पडीक असलेल्या शासकीय निवासस्थानात राहण्याच्या वादातून मुकेश विठ्ठल पोरेड्डीवार (४५, रा. मुळ गडचिरोली) या आपल्याच मित्राचा लोखंडी पाईपाने खून करणाºया बबलु उर्फ गुलामअली बंदरे आलम खान ( (२४, रा. वालधुनी, कल्याण पुर्व ) आणि आकीम अहमंद अलीमुददीन खान (२४, रा. वालधुनी, कल्याण पुर्व ) या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठया शिताफीने रविवारी अटक केली. खूनासाठी वापरलेल्या लोखंडी रॉड आणि लोखंडी अँगलचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.कल्याणमधील रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीचे काम सुरु असतांना ९ आॅक्टोंबर रोजी सकाळी माती काढतांना मुकेशचे शीर मिळाले होते. घटनास्थळी महात्मा पोलीस ठाण्याचे पोलीस आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह माती उकरुन बाहेर काढला होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यु अशी नोंद करण्यात आली. नंतर मात्र वैद्यकीय अहवालाच्या आधारे याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याणचे पोलीस विवेक पानसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या खूनाच्या तपासाचे आदेश महात्मा फुले चौक पोलिसांना दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर आणि निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार आणि दीपक सरोदे यांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या खूनातील मुख्य आरोपी बबलू आणि आकीम खान या दोघांनाही ११ आॅक्टोंबर रोजी दुपारी ४ वा. च्या सुमारास अटक केली. मुळचा गडचिरोजी जिल्हयातील पेठताडा (ता. चुमरसी) येथील रहिवाशी असलेला मुकेश आणि बबलू हे दोघेही कामगार असून रेल्वेच्या नविन बांधकामाच्या ठिकाणी ते मजूर म्हणून कामाला होते. जवळच असलेल्या रेल्वेच्याच क्वार्टर्समधील एका पडीक खोलीत ते राहत होते. मुकेश आणि बबलू या दोघांनाही दारुचे व्यसन होते. दोघांचीही या खोलीत राहण्यावरुन आणि जेवणावरुन नेहमी भांडणे होत होती. मुकेश त्या खोलीत आधीपासून असल्यामुळे आपणच या खोलीत राहणार तू राहू नकोस, असे त्याने बबलूला बजावले होते. त्याने बबलूला त्या खोलीत जेवणही बनविण्याला नकार दिला होता. यातूनच संतापलेल्या बबलूने आकीम या साथीदाराच्या मदतीने ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुकेश झोपेत असतांनाच त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. यातच त्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून जवळच असलेल्या अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोणताच धागादोरा नसतांनाही महात्मा फुुले चौक पोलिसांनी या क्लीष्ट खूनाचा तपास केल्याबद्दल उपायुक्त पानसरे यांनीही तपास पथकाचे अभिनंदन केले.
घरात राहण्याच्या वादातून मित्राचाच खून करणाऱ्या दोघांना कल्याणमध्ये अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 11, 2020 11:40 PM
रेल्वेच्या पडीक घरात राहण्याच्या वादातून मुकेश पोरेड्डीवार (४५) या आपल्याच मित्राचा लोखंडी पाईपाने खून करणाºया बबलु उर्फ गुलामअली बंदरे आलम खान ( (२४) आणि आकीम अहमंद अलीमुददीन खान (२४) या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठया शिताफीने रविवारी दुपारी अटक केली. शुक्रवारी सकाळी नविन बांधकामाच्या ठिकाणी त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. कोणताही धागादोरा नसतांना या खूनाचा पोलिसांनी छडा लावला.
ठळक मुद्दे महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरीखूनानंतर मृतदेह पुरला जमिनीत