लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाचपाखाडीतील नामदेववाडी भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणावर पूर्ववैमनस्यातून चॉपरचे वार खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी संदीप जाधव (२४) आणि रवी मोरे (३१) या दोघांना शनिवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी ठाणे न्यायालयाने दिले आहेत.या घटनेतील तक्रारदार हा १३ नोव्हेंबर रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास पाचपाखाडी येथील घरी जात होता. त्याचवेळी संदीप जाधव याने त्याला आवाज देऊन सोसायटीमध्ये बोलावून घेतले. संदीप तसेच रवी मोरे आणि कमल्या या तिघांनी त्याच्या डोक्यावर चॉपरने वार केले. त्याने आपल्या बचावासाठी हात वर केले असता, त्याच्या हातावरही वार करण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने संदीप आणि रवी या दोघांना अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 10:40 PM
पाचपाखाडीतील नामदेववाडी भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणावर पूर्ववैमनस्यातून चॉपरचे वार खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी संदीप जाधव (२४) आणि रवी मोरे (३१) या दोघांना शनिवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्दे१८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशतिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू