ठाणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची आॅनलाईन विक्री करुन फसवणूक करणा-या रोहित राजेंद्रकुमार धवन उर्फ पृथ्वी अमीन (३०, रा. वसई, पालघर) आणि रु नित जयप्रकाश शाह (३५, रा. उत्तन, भार्इंदर, ठाणे) या दोघांना मोठया कौशल्याने गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक देवराज यांनी शुक्रवारी दिली. या दोघांनाही ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दोघांपैकी रोहित हा उच्चशिक्षित असून त्याने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर (एमकॉम) शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षाही तो उत्तीर्ण झाला आहे. युटयूब वरील ‘झटपट पैसा कसा मिळवावा’ याचे तंत्र सांगणारी एक क्लिपिंग त्याने पाहिल्यानंतर त्याने ही शक्कल लढविल्याची कबूली दिली. आॅनलाईनद्वारे ओएलक्सवर जुन्या वस्तू विकून मोठया प्रमाणात फायदा मिळवून देण्यासाठीचे तंत्र यामध्ये सांगण्यात आले होते. याचाच आधार घेत रोहित याने बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड बनवून कर्जावर खरेदी केलेले वाहन स्वस्तामध्ये आनलाईनद्वारे खरेदी केले. तशाच वाहनांची कागदपत्रे प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरुन घेऊन त्या वाहनाचा इंजिन आणि चेसिस क्रमांक स्वस्तामध्ये खरेदी केलेल्या गाडीला लावला. त्यामुळे कागदपत्रेही खरी असल्याचे भासवून नाममात्र दरात मिळवलेली गाडी ते सात ते आठ लाखांमध्ये विक्री करुन पसार व्हायचे. प्रत्यक्षात आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर मात्र ही सर्व कागदपत्रेच बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात येत होते. असे प्रकार वाढल्यामुळे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आॅनलाईन द्वारे खरेदी विक्री करुन फसवणूक करणा-यांवर कारवाईचे आदेश दिले होते. अशाच प्रकारचा एक गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलिकडेच दाखल झाला होता. यात मिळालेले सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार आणि जमादार बाबू चव्हाण आदींच्या पथकाने रोहित आणि रुनित या दोघांना ३० जानेवारी रोजी अटक केली.कशी झाली फसवणूककापूरबावडी पोलीस ठाण्यात अलिकडेच दाखल झालेल्या या गुन्हयामध्ये आरोपींनी टोयाटो कंपनीची इटीओस लिवा ही गाडी कर्ज असलेली गाडी ७० हजारांमध्ये आॅनलाईनद्वारे खरेदी केली. तिचा क्रमांक बदलून आरटीओच्या संकेतस्थळावरुन मिळविलेल्या दुस-याच एका वाहनाचे क्रमांक लिवा कारला लावले. त्यानंतर ती कार नागपूरच्या एका डॉक्टरला एक लाख ९६ हजारांमध्ये विक्री केली. प्रत्यक्षात गाडीची सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर फसवणूक झाल्याचे या डॉक्टरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्याने या आधी अशीच टोयाटोची कार अवघ्या २५ हजारांमध्ये खरेदी करुन नंतर ती तीन लाख ७० हजारांमध्ये विकल्याचीही कबूली दिली. याप्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाले आहे. या दोघांनीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची शक्यता उपायुक्त देवराज यांनी वर्तविली आहे.व्यवसायातील अपयशाने पत्करला मार्गव्यवसाया अपयश आल्यामुळे युटयुबवर पैसे कैसे मिळवायचे याचा त्यांनी एक व्हीडीओ पाहिला होता. त्यातूनच त्यांनी फसवणूकीची एक योजना तयार केली. प्रथम विक्र ीला असलेल्या चारचाकी कर्जाऊ गाडया शोधल्या. त्या मिळाल्यानंतर संबंधित मालकाशी संपर्क करतांना बनावट सिमकार्डचा त्यांनी वापर केला. बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार करुन वाहन खरेदी केली. खरी ओळख लपवून बनावट नावानेच गाडीचे व्यवहाराचे तसेच इतर कागदपत्रेही त्यांनी बनविले. ज्या गाड्या खरेदी केल्या आहेत त्याच गाड्यांचे दुसरे मॉडेल शोधून गाडयांचे स्मार्ट कार्ड , आरसीबुक इतर कागदपत्रे डाऊनलोड करुन त्या गाडीचे नंबर प्लेट लोन असलेल्या गाडीला लावून सर्रास फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. बँकेची लोन रिकव्हरी वाले संबंधित गाडी विकवणाºयांच्या पाठपुरावा करीत असल्याने एकाच वेळी दोन व्यवहार करणाºयांसह आरटीओची देखिल ते फसवणूक करीत असल्याचे यात डघड झाले आहे. बनावट कागदपत्रे असल्यामुळे त्यांचा शोधही घेणे पोलिसांना आव्हान होते. अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. असे व्यवहार करतांना सावधानता बाळगावी, असे आवाहन देवराज यांनी केले आहे.