लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बिबटयाच्या कातडीची दहा लाख ९० हजारांमध्ये तस्करी करणाºया सचिन भोसले (३३) आणि शहाजी दांडे (३२) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्या झडतीमध्ये बिबटयाचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.ठाण्यातील सिडको बस थांब्यावर दोघेजण बिबटयाच्या कातडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची ‘टीप’ पोलीस हवालदार गणेश बडगुजर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, संदीप बागुल, योगेश काकड तसेच पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड, संभाजी मोरे, सुनिल माने, रवींद्र काटकर, बडगुजर, भगवान हिवरे आदींच्या पथकाने २३ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सिडको बस थांबा येथे सापळा लावला. त्यावेळी तिथे आलेल्या सचिन आणि शहाजी या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून बिबटयाचे कातडे हस्तगत करण्यात आले. या धुमश्चक्र त्यांचा तिसरा साथीदार मात्र तिथून निसटला. सखोल चौकशीमध्ये ते या कातडयाची दहा लाख ९० हजारांमध्ये विक्री करणार होते, अशी त्यांनी कबूली दिली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २४ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सुरुवातीला २६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर ९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, त्यांच्या तिसºया साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात बिबटयाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 9:23 PM
बिबटयाच्या कातडीची ठाण्यात विक्रीसाठी आलेल्या सचिन भोसले आणि शहाजी दांडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाईदहा लाखांचे कातडे हस्तगत