लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येऊरच्या जंगलातून बेकायदेशीरपणे लाकडांची तस्करी करणाºया दोघांना ठाणे वनविभागाने अटक बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून लाकडांनी भरलेला टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील येऊर वनक्षेत्रातील पाचपाखाडीतील राखीव वन सर्वे क्रमांक ४१८ मधुबन गेट येथून ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास लाकडांची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती किशोर म्हात्रे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांकडून वन विभागाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे विनापरवाना लाकडांची वाहतूक करणारा टेम्पोतून इंजायली झाडांचे ८८ नग तर किटा माल सहा घनमीटर इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ८ सप्टेेंबर रोजी गुन्हा दाखल झाला करुन दोघांना अटक करण्यात आली. सहायक वनसंरक्षक डी. एम. दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनअधिकारी गणेश सोनटक्के, वन अधिकारी सुजय कोळी, रमाकांत मोरे, राजन खरात आदींच्या पथकाने केली. ही लाकडे खासगी क्षेत्रातील असल्याचा दावा वनविभागाने पकडलेल्या दोघा आरोपींनी केला आहे.
येऊरच्या जंगलातून बेकायदेशीरपणे लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 00:25 IST
येऊर वनक्षेत्रातील पाचपाखाडीतील राखीव वन सर्वे क्रमांक ४१८ मधुबन गेट येथून ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास लाकडांची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती किशोर म्हात्रे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांकडून वन विभागाला मिळाली.
येऊरच्या जंगलातून बेकायदेशीरपणे लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देठाणे वनविभागाची कारवाईटेम्पोसह लाकडेही जप्त