लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिस सय्यद याने अमित यांच्यावर थेट शिवसेना शाखेत जाऊन चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे सुरुवातीला त्याला ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे.बाजारपेठेतील एका गाळ्याच्या समोरील जागेवरु न हा वाद उफाळून आल्याचे सांगण्यात येते. उस्मान याने शिवसेना शाखेत शिरतांना दोन चाकू नेले होते. त्यातील एक चाकू खुर्चीवर तर दुसºया चाकूने अमित यांच्या डोक्यावर, गळयावर, खांद्यावर आणि पायावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात एकमेकांविरु द्ध गुन्हे दाखल झाले असून अमित यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघांनाचौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर अनिस याच्यावरील हल्ल्याप्रकरणी नऊ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी भेट देऊन पाहणी केली.* पालकमंत्र्यांनी घेतला आढावा-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित जयस्वाल यांची ठाण्यातील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच या घटनेचाही त्यांनी पोलिसांकडून आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने हल्ल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:09 PM
श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी दिली.
ठळक मुद्देशिवसेना शाखेतच झाला हल्लाराबोडी पोलिसांची कारवाई