लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: माजीवडा येथील अंकित ठक्कर (३६, रा. माजीवडा, ठाणे) यांच्या हातातील मोबाइलची जबरीने चोरी करुन मोटारसायकलवरुन पळ काढणा-या या प्रतिक शांताराम शर्मा (१९, रा. कोलशेत, ठाणे) आणि अक्षय लक्ष्मण पाटील (१९, रा. गोवंडी, मुंबई) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.माजीवडा येथील लोढा पॅराडाई, या सोसायटीतील रहिवाशी ठक्कर हे ६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या सोसायटीसमोरील रस्त्यावरुन त्यांच्या पाळीव कुत्र्यासह फेरफटका मारीत होते. त्याचवेळी एका सफेद रंगाच्या मोटारसायकलीवरुन आलेल्या या दोघांपैकी मागे बसलेल्या अक्षयने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी ७ सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षकअशोक वाघ यांच्या पथकाने त्यांनी वापरलेल्या मोटारसायकलीचा शोध घेऊन आधी ठाण्यातून प्रतिकला मोटारसायकल तसेच चोरीतील मोबाइलसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अक्षयलाही ७ सप्टेंबर रोजी अटक केली. या दोघांनाही १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांना आता २७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक: दोन मोबाइलसह मोटारसायकलही हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:47 PM
मोबाइलची जबरीने चोरी करुन मोटारसायकलवरुन पळ काढणाºया या प्रतिक शांताराम शर्मा आणि अक्षय लक्ष्मण पाटील या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना आता २७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कामगिरी दोघांनाही मिळाली न्यायालयीन कोठडी