लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधील बॅट-या चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या जयेश गणपत जमाटे (२१, रा. रोनाचा पाडा, येऊर, ठाणे) आणि शशिकांत शंकर जमाटे (२१, रा. येऊर, ठाणे) या दोघांना गस्तीवरील नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिलें आहेत.सिद्धेश्वर तलाव परिसरातील सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षामधील बॅटरीची चोरी जयेश आणि शशिकांत हे दोघेही ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास करीत होते. सुदैवाने त्याच वेळी नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पथक त्याच मार्गावरुन जात होते. या पथकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी या दोघांनाही हटकले. त्यानंतर या दोघांनीही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दोघांना रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 11:12 PM
सिद्धेश्वर तलाव परिसरातील काही रिक्षांच्या बॅट-या चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या जयेश गणपत जमाटे (२१, रा. रोनाचा पाडा, येऊर, ठाणे) आणि शशिकांत शंकर जमाटे (२१, रा. येऊर, ठाणे) या दोघांना गस्तीवरील नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली.
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईन्यायालयीन कोठडीत रवानगी