लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया खतांचा बेकायदेशीर साठा करुन त्यांची विक्री करणाºया आनंदा पवार आणि विजय ठक्कर या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून आठ लाख ३१ हजार ११२ रुपयांच्या खतांचा साठा आणि बनावट पिशव्या जप्त केल्या आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शीळ डायघर परिसरातील एकता इंडस्ट्रीयल इस्टेट येथील एका गोदामामध्ये शेतकºयांसाठी ‘अनुदानित’ असलेल्या खतांची बेकायदेशीरपणे साठवणूक करुन त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ८ डिसेंबर रोजी या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार तसेच कृषी विभागाच्या अधिकाºयांनी संयुक्तरित्या धाड टाकून त्याठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये गुजरातच्या नर्मदा व्हॅली फर्टीलायझर कंपनी लिमिटेड या शासकीय अंगिकृत खत निर्मिती कंपनीच्या युरिया नावाचे खत भरावयाच्या बनावट पिशव्या तसेच गोण्या तयार केल्या जात होत्या. त्यामध्ये बेकायदेशीर साठा केलेले खत भरुन त्याची विक्री केली जात असल्याचे उघड झाल्यामुळे आनंदा पवार याला या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या ताब्यातील गोदामामधून आठ लाख ३१ हजार ११२ रुपये किंमतीचा युरिया खताचा साठा, बनावट पिशव्या आणि इतर सामुग्री जप्त केली. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियमासह फसवणूकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ठाणे न्यायालयाने आनंदा आणि विजय या दोन्ही आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया खतांचा साठा करणाºया दोघांना ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 6:08 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया खतांचा बेकायदेशीर साठा करुन त्यांची विक्री करणाºया आनंदा पवार आणि विजय ...
ठळक मुद्दे आठ लाख ३१ हजारांचा खतांचा साठा जप्त ठाणे गुन्हे शाखेची कारवाई