मीरारोड - पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने वरसावे येथील साई द्वारकेश काठियावाडी ढाब्याजवळ अमली पदार्थ मिश्रित औषध साठ्यासह दोघांना अटक केली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षचे निरीक्षक अमर मराठे, सहायक निरीक्षक अमोल आंबवणे, उपनिरीक्षक संतोष घाडगे सह इंगळे, टक्के, पाटील, कुडवे, सपकाळ, आव्हाड, यादव यांच्या पथकास ढाब्या जवळ दोन इसम संशयित दिसले . पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता 'कोडेन फॉस्फेट' हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या ३०० बाटल्या , अल्प्राझोलमच्या १० हजार ८०० गोळ्या असा ३ लाख ६६ हजारांचा साठा सापडला.
पोलिसांनी विकास चंपकलाल जैन रा. जेसलपार्क, भाईंदर व हेमंत पारसमल सेठिया रा. कासारवडवली, ठाणे दोघांना पकडून काशीमीरा पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संतोष घाटगे पुढील तपास करत आहेत.