लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घरफोडी करून घरातील रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या श्रवण रमेश कन्होजीया (१९, कोलशेत, ठाणे) आणि अनिल पवार (२०, बाळकुम, ठाणे) या दोन सराईत चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १८ मोबाईल, रोकड आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा दोन लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ठाण्यातील कापूरबावडी भागात एकाच दिवसात दोन ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनांमधीलन सात हजारांची रोकड आणि एक विवो कंपनीचा फोन चोरटयांनी नेला होता. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची माहिती काढली असता ही चोरी दोघा तरु णांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने श्रवण कन्होजीया आणि अनिल पवार या दोघांना ७ जून रोजी अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्हयांची कबूली दिली असून त्यांच्याकडून १८ मोबाईलसह दोन लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद: अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 11:36 PM
घरफोडी करून घरातील रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या श्रवण रमेश कन्होजीया (१९, कोलशेत, ठाणे) आणि अनिल पवार (२०, बाळकुम, ठाणे) या दोन सराईत चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील दोन लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे कापूरबावडी पोलिसांची कारवाई