शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

ठाण्यात होणार मेट्रोचे दोन कास्टिंग यार्ड; एमएमआरडीएसमोर भूसंपादनाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:19 AM

जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे करण्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

- नारायण जाधवठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे करण्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी लागणाºया जमिनीच्या भूसंपादनासह विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएच काम पाहणार आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार कोपरीतील कास्टिंग यार्डसाठी २६.८८ हेक्टर, तर कावेसर येथील कास्टिंग यार्डसाठी ९.६४ हेक्टर जमीन लागणार आहे. मात्र, यापूर्वी कासारवडवली आणि गायमुख येथील मेट्रोच्या कारशेडला आमदार प्रताप सरनाईकांसह स्थानिकांचा मोठा विरोध झाला होता. त्यामुळे या दोन्ही कास्टिंग यार्डची जमीन संपादित करण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीएसमोर राहणार आहे.वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ आणि ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ चे एकत्रीकरण करून विस्तारित ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्पास आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मेसर्स डापोलोनिया एसपीए आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यानुसार, या मार्गासाठी त्यांनी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान या मार्गावर १७ स्थानके प्रस्तावित असून या मार्गावर सुरुवातीला पाच मिनिटांच्या अंतराने, तर नंतर चार मिनिटांनी मेट्रो धावेल, असे सूचित केले आहे. यासाठी मार्च २०२१ ही डेडलाइन दिली आहे. त्यादृष्टीने आता ठाणे शहरातच दोन ठिकाणी तिचे कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार आहे.ठाणे पालिकेचे अधिकार काढलेकोपरीतील सर्व्हे क्र. ८६ व कावेसरमधील सर्व्हे क्रमांक ३११ ते ३१३ येथे ही कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी या भागात सध्या नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहत असलेल्या ठाणे महापालिकेचे अधिकार काढून ते एमएमआरडीएला बहाल केले आहेत.- यापूर्वी गेल्या आठवड्यात या मार्गावरील मेट्रो स्थानकांचे डिझाइन तसेच कारशेडची रचना कशी असावी हे ठरविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रि या सुरू केली आहे. यासंबंधीची निविदा मागविण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. मेट्रो-५ वेळेत पूर्ण व्हावा, म्हणून त्याचा निकडीच्या प्रकल्पात समावेश केला असून यामुळे सर्व शासकीय आणि पर्यावरण, वन खात्याच्या परवानग्यांसह जमीन संपादित करावी लागणार आहे.सीआरझेडचा अडथळा येणारकोपरी सीआरझेडमध्ये मोडते. तो अडथळा पार करण्यास मेट्रोला केंद्राचे उंबरठे झिझवावे लागतील. कावेसरच्या वनजमीनीसाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागेल.नियोजित स्थानकेकापूरबावडी, कशेळी, बाळकुमनाका, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकरनाका, भिवंडी, गोपालनगर, टेमघर, राजनोली, गोवे एमआयडीसी, कोन, दुर्गाडी, सहजानंद चौक, कल्याण स्टेशन, कल्याण एपीएमसी.मार्गाची वैशिष्ट्येमार्गाची लांबी : २४.९ किमीप्रस्तावित कारडेपो : १५ हेक्टर, कोनगावइतर लागणारी जमीन : ३.२५ हेक्टरतात्पुरती लागणारी जमीन : ६ हेक्टरप्रकल्प कालावधी : ४१ महिनेजमिनीशिवाय मूळ किंमत : ५१९७.५० कोटीजमिनीची किंमत : ११२.५२ कोटीआकस्मिक खर्च : ३.३८ कोटीराज्य शासनाचा कर : ७१६.४६ कोटीकेंद्र शासनाचा कर : ५९२.३८ कोटीदरवाढ : १७७४.२८ कोटीबांधकामादरम्यानचे व्याज : २० कोटीएकूण किंमत : ८४१६.५१ कोटी

टॅग्स :thaneठाणे