शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Published: April 10, 2017 4:13 AM

ठाणे : पोहता न आल्याने मुलुंडमधील दोन अल्पवयीन मुलांचा ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून मृत्यू

ठाणे : पोहता न आल्याने मुलुंडमधील दोन अल्पवयीन मुलांचा ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, ही घटना पाहणाऱ्या त्यांच्या सवंगड्यांनी मात्र भीतीने तिथून धूम ठोकली. त्यांच्या या साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यश रवी खरात (१०) आणि प्रज्ञेश सचिन शिंदे (१५) रा. अशोकनगर, मुलुंड अशी तलावात बुडालेल्यांची नावे आहेत. दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हे दोघे आणि त्यांचे आणखी तीन साथीदार असे पाच जण पोहण्यासाठी उतरले होते. यश आणि प्रज्ञेश यांच्यापैकी एकाला पाण्याचा नेमका अंदाज न आल्याने एक जण गटांगळ्या खात असल्याचे दुसऱ्याने पाहिले. दोघे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात खोल पाण्यात बुडाले. आरडाओरडा ऐकून स्थानिक रहिवासी आेंकार पाटील हे बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले, परंतु नेमकी कोणत्या ठिकाणी ते बुडाले, याचा त्यांनाही अंदाज न आल्याने, त्यांनी अखेर अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने अग्निशमन दलाच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढले. ठाण्याच्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सीताराम वाघ यांनी दिली. (प्रतिनिधी)मुरूडमध्ये पर्यटकाचा बुडून मृत्यूकाशीद समुद्रकिनारा पाहण्यासाठी ४३ जणांचा समूह काशीद ग्रामपंचायत हद्दीमधील सर्वे गावात उतरला होता. रविवारी चिकणी समुद्रकिनारी यातील १६ जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. सकाळी १० वाजता भरतीची वेळ असताना समुद्रात उतरलेले काही लोक पोहता पोहता खोल समुद्रात गेले, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर परत येणे त्यांना कठीण झाले. यातील तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर एकाचा मृत्यू झाला. मयूर भिलारे (२१) असे मृत तरु णाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड येथील जेडी ग्रुप कंपनीतील ४० लोकांचा समूह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आला होता. शनिवारी या सर्वांनी सर्वे येथे वस्ती करून रविवारी यातील १६ जण चिकणी समुद्रकिनारी पोहावयास गेले होते. सकाळी १० वाजता भरतीची वेळ असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने यातील तिघे जण पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यापासून दूरवर गेल्याने आपल्या बचावासाठी त्यांनी आरडाओरडा केला. स्पीडबोटीच्या साहाय्याने सचिन चंडालिया ( २५) व नीलेश बर्गे (२८) यांना वाचवण्यात यश आले; परंतु मयूर भिलारे याला वाचवण्यात अपयश आले. खूप दूरवर निघून गेल्याने त्याचा मृतदेह सापडू शकला नाही. अखेर कोस्टल गार्डच्या मदतीने हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली व अर्ध्या तासाच्या आतच त्यांनी हा मृतदेह शोधून काढला. पाण्यातून बचावलेल्या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली.