शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

ठाण्यातील पूर्व भागात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन, शिवदुर्ग ग्रुपतर्फे प्रदर्शनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 4:42 PM

ठाणे पूर्व मधील पारशीवाडीतील "शिवदुर्ग ग्रुप" हा तरुणांचा समुह गेली काही वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन गडकोट संवर्धन, किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग, दुर्गभ्रमण अशा अनेक उपक्रमातून तो इतिहास अभ्यासण्याचा, जपण्याचा व इतर तरुणांनाही त्याचे महत्त्व समजून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देठाण्यातील पूर्व भागात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शनतलवार,भाले,पट्टा अशी व अनेक शस्त्रे पहावयास मिळतीलशस्त्रसंग्रहक व अभ्यासक जोसेफ लोपीस यांच्या संग्रहातील शस्त्रांचे प्रदर्शन

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे (तिथीप्रमाणे) औचित्य साधून शनिवार १० व रविवार ११ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध शस्त्रसंग्रहक व अभ्यासक जोसेफ लोपीस यांच्या संग्रहातील शस्त्रांचे प्रदर्शन ठाणे पूर्व येथील कोपरी विभागात आयोजित केले आहे. 

     प्रत्येक नागरिकाला इतिहासाजवळ नेऊन त्या इतिहासाबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी काही करावं असच आमच्यातील प्रत्येकाला वाटतं आणि ते इतिहासकालात वापरलेल्या वस्तू प्रत्यक्ष दाखविल्याने सहजरित्या साध्य होऊ शकते असे आम्हाला अनुभवावरुन जाणवते आणि त्यातूनच यंदा शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरले. शिवछत्रपतींच्या काळात युद्धे प्रत्यक्षात कशी केली जात होती, प्रत्येक मावळ्याची शस्त्रसंपदा काय होती या व अशा अनेक गोष्टी या शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर स्पष्ट होतील. शिवकाळात महाराजांशी निगडीत काही गोष्टींचे आजही जनसामान्यांना अप्रूप वाटते.जसे शिवरायांनी वापरलेली भवानी तलवार आणी अफजलखान वधाच्या वेळेस वापरलेले गुप्त शस्त्रे बिछवा-वाघनखे हे तर आहेतच पण तलवार,भाले,पट्टा अशी व अनेक शस्त्रे आपणांस पहावयास मिळतील असे शिवदुर्ग ग्रुपतर्फे सांगण्यात आले. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी आणि आपल्या ज्वलंत इतिहासाशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करा. प्रदर्शनास आपणा सर्वांची भेट हीच आमच्या प्रयत्नांची फलशृती आहे असे या ग्रुपच्या तरुणांनी सांगितले. हे प्रदर्शन सकाळी १०:०० ते रात्रौ १०:०० यावेळेत वसंत पाटिल चाळ, पारशीवाडी, जुने कोपरी पोलिस स्टेशन जवळ ठाणे (पु) ४०० ६०३ येथे आयोजित केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMumbaiमुंबई