ठाणे : जगबुडी व कणकवली येथे अभियंत्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखल फेक केल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सामुहीक रजा घेऊन दोन दिवशीय कामबंद, लेखणी बंद आंदोलन शुक्रवारी सकाळी छेडले. मात्र सार्वजनिक बांधकाममंंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे या आंदोलनास दुपारी मागे घेत पूर्ववत कामे सुरू केले. अभियंत्यांवर चिखलफेक करून अवमान केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली रात्र्यभर सामुहीक रजा घेऊन कामबंद, लेखणी आंदोलन छेडले. पण सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाच्या दरम्यान ठिकठिकाणी अपतकालीन घटना घडत आहे. त्यावर उपाययोजनां करणारी प्रमुख यंत्रणेचे आंदोन प्रसंगी तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधीतांवर कारवाईसह या पुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. यासाठी अभियंत्यांना आवश्यक सुरक्षा व संरक्षण देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्यामुळे शुक्रवारी व शनिवार या दोन दिवशीय कालावधीचे आंदोलन मागे घेतल्याचे या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.राज्यभरातील संतापलेल्या अभियंत्यांनी एकत्र येऊन कणकवलीच्या घटनेच्या निषेधार्थ ऐन पावसाळ्यात आंदोलन छेडले.एवढेच नव्हे तर शासकीय सेवेतील अभियंत्यांचा छळवाद, मारहाण, शिवीगाळ करणाºया अपप्रवृत्ती विरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. याची वेळीच दखल घेऊन पाटील यांनी आश्वासन देताच अभियंत्यांनी देखील आंदोलन मागे घेत पूर्ववत काम सुरू केले. या आंदोलनात राज्यभरातील शासकयी सेवेतील २० हजार अभियंत्यांमध्ये जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व शाखांच्या अभियंत्यांचा समावेश होता. या आंदोलनाच्या पश्वभूमीवर शासन आता कार्य निर्णय घेणार व अभियंत्यांच्या दृष्टीने कायदेशीर काय सुरक्षा देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.* अन्यथा अभियंत्यांचा भडका -अमानुष डळाची मालिका वेळीच संपवावी, गुन्हेगाराविरू ध्द कडक कारवाई करावी, पुरेसा निधी व मनुष्यबळ कामाच्या प्रमाणत उपलब्ध करून द्या, क्षेत्रावरील कामाच्या स्थितीनुसार संकल्पन व संशोधन अभ्यासानुसार कामाचे मूल्य ठरावे,अतिरिक्त काम करण्यास दबाव आणू नये, लोकप्रतिनिधींनी कनिष्ठ स्तरावरील अभियंत्यांना परस्पर सूचना देऊ नये आदी मागण्या या अभियंत्यांनी लावून धरल्या आहेत. अन्यथा असंतोषाचा भडका विकास कामांवरील विपरीत परिणाम करणारा ठरणार असल्याचे इशारा या अभियंत्यांनी दिला आहे.
चिखल फेकच्या निषेधार्थ अभियंत्यांचे दोन दिवशीय काम बंद आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 6:00 PM
अभियंत्यांवर चिखलफेक करून अवमान केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली रात्र्यभर सामुहीक रजा घेऊन कामबंद, लेखणी आंदोलन छेडले.
ठळक मुद्देचिखल फेक केल्याची दुर्दैवी घटना दोन दिवशीय कामबंद, लेखणी बंद आंदोलन सार्वजनिक बांधकाममंंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस कारवाईचे आश्वासन