डोंबिवली : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या गुडविन ज्वेलर्सच्या डोंबिवलीसह इतर शहरांतील दुकानांचे सील ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तोडून तपासणी केली. मात्र, दुकानात सोन्याचे दागिने अथवा पैसे मिळाले नसल्याने गुंतवणूकदारांच्या आशेवर पाणी फिरले. त्यामुळे गुडविनचे संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी नियोजन करूनच दिवाळीपूर्वी पलायन केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.
डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्समध्ये अनेकांनी गुंतवणूक केली होती. मुदत ठेव, भिशी योजना आदींमध्ये काही गुंतवणूकदारांनी वर्षभरासाठी तर काहींनी दोनतीन वर्षांसाठी गुंतवणूक केली होती. एका ५० वर्षांच्या महिलेनेही चार वर्षांसाठी पैशांच्या स्वरूपात गुंतवणूक केली होती. जुलैमध्ये त्याची मुदत संपल्याने ती गुडविन ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आपले गुंतवलेले पैसे परत घेण्यासाठी आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिला सेल्समनने त्या महिलेची परवानगी न घेता ही रक्कम पुन्हा मुदत ठेव योजनेत गुंतवली. याबाबत गुंतवणूकदार महिलेने जाब विचारला असता संगणकामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर, तीन महिन्यांनी दिवाळीमध्ये या रकमेचा परतावा देण्याचे आश्वासन महिला सेल्समनने गुंतवणूकदार महिलेस दिले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गुंतवणूकदार महिला कामानिमित्त आपल्या गावी गेली होती. मात्र, गावावरून ती दिवाळीपूर्वी परतली असता तिला दुकान बंद झाल्याचे दिसले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. या दुकानात मासिक हप्त्याचे पैसे भरण्यासाठी गेली असता तिला दुकानात दागिने दिसले नाहीत.नवरात्रातच आला होता संशयच्नवरात्रात गुडविन ज्वेलर्समध्ये गेलो होतो. तेव्हा, दुकानात दागिन्यांचे प्रमाण खूपच कमी असल्याचे निदर्शनास आले. ही बाब खटकल्याने तेथील कर्मचाºयाला विचारणा केली असता सोन्याचे भाव वाढले आहेत.च्तसेच दुकानात काम करणारे कारागीर गावाला गेले आहेत. म्हणून आम्ही दुकानात सोने ठेवले नसल्याचे तेथील महिला कर्मचाºयाने सांगितल्याचे गुंतवणूकदार किशोर महाजन यांनी सांगितले.च्एवढे मोठे दुकान आहे आणि दुकानात थोडेफारदेखील सोने नाही, हे पाहून संशयदेखील आला होता. त्यामुळे, आपण केलेली एक गुंतवणूक काढून घेतल्याचेही महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर, आमच्या ओळखीचे कर्मचारीही त्यावेळी दुकानात दिसले नाहीत