शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

कळव्यातील मृत्यूतांडव; दोन डॉक्टर निलंबित; नोटिसीला असमाधानकारक उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 5:55 AM

या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे ( Marathi News ): महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या समितीने दिलेल्या नोटिशीला समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोघा डॉक्टरांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपा बंजन आणि सहायक प्राध्यापक डॉ. महेश मोरे यांचे महापालिकेने निलंबन केले आहे. 

कळवा रुग्णालयात १२ ऑगस्टला रात्री १०:३० ते १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० पर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. त्याआधीही १० ऑगस्टला एकाच दिवसात रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ घडलेल्या या मृत्युकांडामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली होती. १३ रुग्ण हे अतिदक्षता विभागातील आणि पाच रुग्ण सर्वसाधारण वॉर्डमधील होते. दाेघांनीही समाधानकारक उत्तरे न दिल्याने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.

दोघांची होणार विभागीय चौकशी

मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांना शेवटच्या क्षणी आणल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉ. बारोट यांनी घेतला होता. मात्र, या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांसह पाच जणांची चौकशी समिती नेमून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. समितीचा अहवाल येऊनही त्यावर कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतर अधिवेशनातही दोषींवर कारवाईचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल