शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

कांदळवन ऱ्हासप्रकरणी दोन कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 6:42 AM

पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारास पालिकेने दिले आहे.

मीरारोड - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदे-नियमांचे उल्लंघन मीरा-भाईंदर महापालिकेकडून सातत्याने सुरूच आहे. कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीरपणे जमीनमालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यवधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट दिल्याच्या तक्रारीवरून महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडेंसह ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारास पालिकेने दिले आहे. या ठेकेदाराच्या काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी असतानाच काही ठिकाणी उपकंत्राटदार काम करत असल्याचे आरोप आहेत; तर कांदळवनात नाल्यांची बांधकामे केल्याने ती थांबवून गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती.मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स व हाटकेश येथील पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवन क्षेत्रात महापालिकेने दोन नाल्यांचे बांधकाम चालवले होते. नेमिनाथ हाईट्स मागील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करून पालिकेने आणखी एक नाला बांधण्यास घेतला होता. या ठिकाणी कोणताच नाला नव्हता. तर पाण्याच्या टाकीमागील नालासुद्धा मूळ नैसर्गिक नाला खुला करून तो घोडबंदर खाडीला न जोडताच हा प्रकार पालिकेने चालवला होता. ठेकेदारांना आर्थिक फायदा करून देण्यासह जमीनमालकांना टीडीआर तसेच आजूबाजूच्या विकासकांना फायदा करून देण्यासाठी हा घाट घातल्याच्या तक्रारी नागरिकांनी चालवल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक जागरुक नागरिक असलेल्या रूपाली श्रीवास्तव यांनी सातत्याने तक्रारी चालवल्या होत्या. मीरा-भाईंदर स्तरावरील कांदळवन समितीने या दोन्ही परिसराची पाहणी करून कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून पालिकेने भराव व बांधकाम केल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे त्यांना दोन्ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीसुद्धा महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोडसह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडे, कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे व ठेकेदार यांनी नाल्यांचे बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले होते.  

टॅग्स :forestजंगलMira Bhayanderमीरा-भाईंदर