ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उपचारार्थ ठाणे जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसोबत येणा-या नातेवाइकांना आता दोनवेळचे मोफत जेवण मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सकाळी जेवण दिले जात होते. त्यातच, गुरुवारी दसºयाचे औचित्य साधून ठाण्यातील समतोल सेवा फाउंडेशनने सायंकाळी मोफत भोजनाची व्यवस्था सुरू केली आहे.जिल्हा शासकीय रु ग्णालयात ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, कर्जत, कसारा आदी भागांतून दररोज रु ग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. या रु ग्णांसोबत त्यांचे नातेवाईकदेखील येतात. परंतु, त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे रु ग्णालयाच्या आवारातच त्यांना राहावे लागते. तर, दररोज बाहेरचे जेवण न परवडणारे असते. त्यामुळे अशा गोरगरीब रु ग्णांच्या नातेवाइकांसाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रु ग्णांच्या नातेवाइकांना सकाळी एकवेळचे भोजन मोफत दिले जाते. त्यात ठाण्यातील समतोल सेवा फाउंडेशनने सर्व रु ग्णांच्या नातेवाइकांना रूग्णालयाच्या परिसरातच रोज सायंकाळी ७.३० ते ८.३० या दरम्यान मोफत आहाराचा निर्णय घेतला आहे. उपक्रमप्रसंगी आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ. पी.के. देशमुख, डॉ. प्रिया गुरव, डॉ. अर्चना पवार आदी उपस्थित होते.
रुग्णासोबत आलेल्या नातेवाइकांना मिळणार दोनवेळचे मोफत जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 3:25 AM