शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

जूनअखेरीस बसवणार पत्रीपुलाचे दोन गर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:30 AM

तारीख पे तारीख सुरूच : ७५ मीटर लांबीच्या गर्डरचे काम होणार आधी

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पत्रीपुलाच्या कामाला लॉकडाउनचाही फटका बसला आहे. या पुलाचे गर्डर जूनअखेरीस बसवण्यात येणार असून, त्यादृष्टीने राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयार केली आहे.

पत्रीपुलावर १५-२० दिवसांत प्रथम ७५ मीटर लांबीचा गर्डर तर, त्यानंतर काही दिवसांतच दुसरा ३० मीटरचा छोटा गर्डर बसवण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर गर्डरवर काँक्रिटीकरण आणि कल्याण व डोंबिवली दिशेला जोडरस्ते बनवण्यात येतील. अन्य तांत्रिक कामांना निश्चित किती वेळ लागेल, हे सांगणे सध्या अवघड असले तरी ते लवकरात लवकर करण्याचे नियोजन आहे, असे सूत्रांनी सांगितले.

लॉकडाउनमुळे या पुलाचे काम खोळंबले आहे. एमएसआरडीसीच्या नियोजनानुसार हा पूल मार्चमध्ये वाहनांसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र, या पुलाच्या कामाच्या शुभारंभापसून अनेक अडथळे आले. दुसरीकडे धोकादायक बनलेला ब्रिटिशकालीन पूल पाडल्यापासून पुलाच्या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका कल्याण आणि डोंबिवलीतील वाहनचालकांना बसला आहे.

सध्या जूनअखेरपर्यंत लोकल बंद असल्याने तोपर्यंत गर्डरचे काम पूर्ण करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. सध्या लोकल बंद असल्या तरी मालगाड्या आणि सोमवारपासून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या पुलावर गर्डर टाकण्यासाठी रेल्वेला ट्रॅफिक ब्लॉकचे नियोजन करावेच लागणार आहे. एमएसआरडीसीला त्यासाठी कामाचा पक्का आराखडा रेल्वेला सादर करावा लागणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. क्रेन कधी येईल हे निश्चित झाले की, ब्लॉकसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.दिल्ली किंवा हैदराबादहून येणार क्रेनपत्रीपुलाचे ७५ व ३० मीटरचे दोन्ही गर्डर बसवण्यासाठी हैदराबाद किंवा दिल्ली येथून विशेष इलेक्ट्रीक क्रेन मागवण्यात येणार आहे. ती क्रेन कल्याणला कधी येणार, त्यावर गर्डर बसवण्याची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.