शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मुंब्य्रात दोन हुक्का पार्लरवरील धाडीत दोन मालकासह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 8:10 PM

मुंबई एका हुक्का पार्लरमुळे कमला मिल भागात लागलेल्या आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुंब्य्रातही सोमवारी दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देसोमवारी रात्रीच्या वेळी कारवाईमुंब्रा बायपासवर नव्यानेच सुरु झाले होते पार्लरनशेच्या सामुग्रीसह साहित्य जप्त

ठाणे: दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरु झालेल्या एका हुक्का पार्लरवर कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चार जणांना अटक केली. नशेसाठी त्यांनी वापरलेली सामुग्रीही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.मुंब्रा परिसरात नव्यानेच दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु झाल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एसीपी धुमाळ यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, पोलीस हवालदार सय्यद फिरोज, धनंजय घोडके, पोलीस नाईक तेजस परब आणि समाधान भोसले आदींच्या पथकाने सोमवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवरील ‘किंग ढाबा’ याठिकाणी छापा टाकून हुक्का पार्लरचा चालक महंमद अफरोज शेख तसेच इरफान शेख आणि राजपूत वर्मा या दोन ग्राहकांना तसेच अन्य एका हुक्का पार्लरमधून चालक इरफान मिर्झा अशा चौघांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. वळतकर यांनी सांगितले.मुंबईच्या पार्श्वभूमीवर कारवाईमुंबईत गेल्याच महिन्यात हुक्का पार्लरमधील आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि परिसरातील अशा बेकायदेशीरपणे चालणा-या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाmumbraमुंब्रा