भिवंडी : शहरातील शांतीनगर-पिराणीपाडा येथे चार मजली मनोहरा ही बेकायदा इमारत शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. तर, इमारत मालक मुन्नवर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.सिराज अकबर अहमद अन्सारी (२६) आणि मोहम्मद आकीब शेख (२७) अशी मृतांची नावे असून अब्दुल अजीज सय्यद (६५), जावेद सलीम शेख (४०) निजाम मोहम्मद अली सिद्दीकी (४५) या जखमींना इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे. विकासक मुन्नवर याची ही इमारत असल्याची माहिती मिळत आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी ही इमारत बांधली होती. इमारत बेकायदा असल्याने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले होते. या इमारतीत २२ कुटुंबे राहत होती. ही इमारत अतिधोकादायक झाल्याने यातील कुटुंबांना रात्रीच बाहेर काढले होते. शुक्र वारी रात्री १ ते १.३० च्या सुमारास दोघे जण घरातील सामान बाहेर काढण्यासाठी गेले असता ही इमारत कोसळली.इमारत अतिधोकादायक झाल्याने ती मनपा कर्मचारी व अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रिकामी करण्यास सुरु वात केली होती. स्वत: महापालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब हे रात्री तेथील नागरिकांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना देत होते.मात्र, मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नजर चुकवून चौथ्या मजल्यावर राहणाºया मोहम्मद अकीब शेख याने घरात पार्क केलेली दुचाकी घेण्यासाठी साथीदारासह चौथ्या मजल्यावर गेला आणि त्याचवेळी इमारत कोसळून दोघांचा जीव गेला.अधिकारी, अग्निशमन जवान बचावलेइमारत अतिधोकादायक असल्याने मनपाचे अधिकारी, कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी या इमारतीच्या ठिकाणी नागरिकांना सतर्क करत इमारत रिकामी करण्यासाठी गेले होते, तर काही पत्रकार रात्री घटनेची माहिती घेण्यासाठी गेले होते. मनपा कर्मचारी व पत्रकार इमारतीच्या बाजूला उभे होते. तेव्हाच ही इमारत कोसळली. यामध्ये बचावकार्य करणारे अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. उपस्थानक अधिकारी नरेंद्र बवाणे आणि फायरमन देविदास वाघ अशी जखमी जवानांची नावे आहेत. त्यांनाही इंदिरा गांधी रु ग्णालयात दाखल केले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाºयाखाली कोणी अडकले आहे का, यासाठी ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून घटनास्थळी मनपा व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफ व टीडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत.
सहा वर्षांपूर्वी बांधलेली इमारत कोसळून दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 5:28 AM