शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

कल्याण-डोंबिवलीत उभी राहिली दोन लाख बेकायदा बांधकामे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:23 AM

उद्यानाच्या आरक्षणावर बांधकाम

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्र, २७ गावे आदी ठिकाणी दोन लाखांहून अधिक बेकायदा बांधकामे झाली असून, त्यावर कोणीही कारवाई करत नाही. मनपा प्रशासन असो की सत्ताधारी, विरोधी पक्ष सगळे याला जबाबदार आहेत. ते सगळे एका माळेचे मणी असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केली.

बेकायदा बांधकामांबाबत सातत्याने आवाज उठवूनही कारवार्ई होत नाही. या शहरांमधील ९० टक्के बांधकामे ही आराखड्यानुसार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. या संदर्भात वर्षानुवर्षे लढा सुरू आहे. आताही नुकतेच क्रीडासंकुलाजवळील बेकायदा गाळे बांधल्यासंदर्भात गोखले यांनी मनपाला पत्र दिले होते. त्यावर पालिकेने कारवाई केल्याचे खोटे सांगितल्याची टीकाही गोखले यांनी केली.ते म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली, त्यांचीही चौकशी करावी, याबाबत पाठपुरावा सुरू आहे. ज्या एका प्रकरणात मनपाचे अधिकारी निलंबित झाले होते, तेथेही चार मजले जादा चढवले गेले आहेत.डोंबिवली पश्चिमेत उद्यानाच्या आरक्षणावर उभारलेल्या इमारतीवर तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके असताना हातोडा पडला होता, पण आता तेथे सगळे आलबेल आहे. इमारत डागडुजी करून वापरात आणली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केडीएमसीत आयएएस दर्जाचे आयुक्त आणून फायदा काय झाला? बेकायदा बांधकामे वाढतच असून, त्याला आळा बसला का, असा सवाल त्यांनी केला. २७ गावांसंदर्भात ते म्हणाले की, राजरोसपणे बेकायदा बांधकामे सुरू असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही.वेळोवेळी जाहीर होणाºया बेकायदा बांधकामांपैकी किती बांधकामांवर कारवाई झाली, याचे काहीही उत्तर नाही? त्याला जबाबदार कोण? जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले.

बेकायदा बांधकामांचा पैसा नेमका जातो कुठे? त्याची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत, याची सखोल चौकशी करावी, आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण द्यावे, यासाठीही ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे गोखले म्हणाले. काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे