भिवंडी: मित्रांसोबत पाण्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. मयत मुलांमध्ये एक सात वर्षांचा मुलगा तर एक बारा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
वसीम मलिक वय ७ वर्ष रा. फातिमा नगर व अंजुम फत्ते मो.रफिक वय १२ वर्ष रा.धामणगाव धापशी पाडा असे मयत मुलीचे नाव आहे.वसीम हा तालुक्यातील वडपा धामणगाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता.यावेळी हा मुलगा आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम व इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे साचलेल्या ओव्हळाच्या पाण्यात पोहायला गेले होते.
यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.यावेळी बाजूला उभ्या असलेल्या दोन साथीदारांनी आरडाओरड केल्याने येथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने मुलांचा आवाज ऐकून पाण्यातून मुलांना बाहेर कडून उपजिल्हा रुग्णालयात नेले मात्र येथे येण्या आधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेबाबत तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.