लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोंबड्यांची वाहतूक करणा-या टेम्पोची मेट्रोच्या कामांसाठी लावलेल्या बॅरिकेट्सला धडक बसून झालेल्या अपघातामध्ये चालक अकिल अहमद (३८) आणि क्लीनर सय्यद अली शेख (३५) हे दोघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तीनहातनाका येथे घडली. या दोन्ही जखमींंना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामुळे महामार्गावर एक तास मोठी वाहतूककोंडी झाली होती.तीनहातनाका येथे मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे त्याठिकाणी एमएमआरडीएने बॅरिकेट्स लावले आहेत. मुंबई-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणा-या कोंबड्या वाहतूक करणा-या या टेम्पोची त्याला जोरदार धडक बसली. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गुरुद्वाराजवळ माहूल ते मध्य प्रदेश जाणा-या टँकर आणि बंगलोर ते अहमदाबाद जाणाºया कंटेनरलाही या टेम्पोची धडक बसली. यात टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोसह तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये टेम्पोचालक अली व क्लीनर शेख हे दोघेही किरकोळ जखमी झाले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. टोविंग व्हॅनच्या मदतीने पोलिसांनी पलटी झालेला टेम्पो बाजूला केला. या अपघातामुळे सकाळी ५ ते ६ या काळात या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. ती नौपाडा पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सुरळीत केली.
ठाण्यात कोंबड्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोला मेट्रोच्या कामामुळे अपघात, चालकासह दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 9:30 PM
मेट्रोच्या कामांसाठी लावलेल्या बॅरिकेट्सला टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये चालक अकिल अहमद (३८) आणि क्लीनर सय्यद अली शेख (३५) हे दोघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तीनहातनाका येथे घडली. या अपघातामुळे या मार्गावर तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
ठळक मुद्देतीन वाहनांचे मोठे नुकसानमहामार्गावर एक तास वाहतूककोंडी