नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महानगरपालिका हद्दीत वंजारपट्टी ते चाविंद्रा या परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघाताच्या दुर्दैवी घटनांमध्ये दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.पहिली घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास वंजारपट्टी नाका येथील भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर घडली तर दुसरी घटना मंगळवार दुपारी चाविंद्रा या परिसरात घडले आहे.आमीर इसाक सय्यद, वय २६ रा. शास्त्रीनगर नविबस्ती व मोहम्मद राशिद सगीर अहमद शेख वय ५० असे या दोन्ही अपघातातील मृतांची नावे आहेत.
पहिल्या घटनेत आमीर इसाक सय्यद रा. नविबस्ती हा आपल्या सहकाऱ्या सह चाविंद्रा रस्त्या कडुन वंजारपट्टी येथील उड्डाणपुलावरून नविबस्ती शास्त्री नगर येथे मोटार सायकलने जात असताना उड्डाणपुला वरील चौकाजवळ नदीनाका कडून चाविंद्राकडे जात असलेल्या भरधाव अज्ञात ट्रकने धडक दिल्याने खड्ड्यात अमीर पडला असता त्याच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात दाखल केला.या घटनेची माहिती नविबस्ती परिसरात समजताच नागरिकांनी मोठी गर्दी रुग्णालय परिसरात एकत्रित झाली होती. या अपघाती मृत्यूच्या घटनेनंतर नविबस्ती परिसरात शोककळा पसरली होती.या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात इमाम हुसैन अली शेर शेख याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर मंगळवारी दुपारी मोहम्मद राशिद सगीर अहमद शेख हे आपल्या दुचाकी वरुन जात असताना समोरून अचानक विरुद्ध दिशेने भरधाव रिक्षा आल्याने आपली दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नांत मोहम्मद राशिद हे ट्रक खाली आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या दोन्ही अपघाती दुर्घटनां मुळे शहरातली रस्त्या वरील खड्डे व दिवसा सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक या मुळे रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. या बद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.