लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या नौपाडा भागातील एक व्यापारी मुकेश धरमचंद जीवावत (५०) हे ११ जानेवारी पासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. दरम्यान, नौपाडा पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जीवावत यांना ५० लाखांचे कर्जही होते. याच चिंतेतून त्यांनी घर सोडल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.घरगुती वापराच्या वस्तूंच्या विक्रीचे दुकान तसेच ड्रायक्लिनिंगचे दुकान अशा वेगवेगळया व्यावसायात मोठी गुंतवणूक असलेले मुकेश यांनी वेगवेगळया लोकांकडूनही व्यवसायासाठी कर्जही घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून ते या कर्जाच्याही विवंचनेत होते. कोणाशी फारशी काही चर्चा न करता, ते ११ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले. ते घरातून स्वत:हून निघून गेले की, त्यांचा काही घातपात झाला? असे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मुकेश यांचे चरईतील दगडी शाळेजवळ सोनाली अपार्टमेंटमध्ये अंडरगारमेंटचे दुकान आहे. ते खारकर आळी टेंभी नाका येथे वास्तव्याला आहेत. घरातत मोबाईल ठेवून ते ११ जानेवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर १२ जानेवारी रोजी त्यांच्या कुटूंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दाखल केली. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत असून दोन पथकेही त्यासाठी नियुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.*पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनमुकेश हे खारकर आळी येथे पत्नी तसेच १८ आणि १५ वयाच्या दोन मुलींसह वास्तव्याला आहेत. त्यांच्याबाबत माहिती असणाऱ्यांनी नौपाडा पोलिसांशी ०२२-२५४४४४३३ आणि ०२२-२५४२३३०० याक्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी केले आहे.
नौपाडयातून बेपत्ता व्यापाऱ्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:24 AM
ठाण्याच्या नौपाडा भागातील एक व्यापारी मुकेश धरमचंद जीवावत (५०) हे ११ जानेवारी पासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाअचानक बेपत्ता झाल्याने अनेक तर्कवितर्क