ठाणे - एकाच शैक्षणिक संस्थेला भुखंड वितरीत करण्याबाबत चक्क दोन वेगवेगळे ठराव करण्यात आल्याची बाब नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी उघडकीस आणली. एका ठरावात या संस्थेने मागितलेली जमीन आणि दुसºया ठरावात मागणीपेक्षा तब्बल २३४० चौ. मी. जागा महापालिकेने दिली असल्याचा आरोप पवार यांनी केला. परंतु प्रशासनाने मात्र दुसरा ठराव खोटा असल्याचे सांगत पवार यांचे आरोप फेटाळून लावले. शनिवारी झालेल्या महासभेत पवार यांनी याबाबतचे पुरावे देखील सभागृहात सादर केले. ठाणे महापालिकेकडे मे. सिध्देश चॅरिटेबल ट्रस्ट ने ३३०० चौ.मी. जागा मागितली होती. त्यामध्ये महापालिकेने केलेल्या पहिल्या ठरावानुसार त्यांना मागितलेल्या जागे पेक्षा अधिक ५ हजार ६८४ चौ. मी. जागा २०१७-१८ च्या रेडिरेकनर दराप्रमाणे वार्षिक भाडेपट्ट्याने ३० वर्षासाठी देण्याचा एक ठराव करण्यात आला आहे. तर त्याचवेळी दुसऱ्या ठरावात मे. सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट यांना ५ हजार ६८४ चौ. मी. जागा न देता त्यांनी विंनती केल्याप्रमाणे ३ हजार ३०० चौ. मी. इतके क्षेत्र कासारवडवली येथे देण्यात यावे असा दुसरा ठराव करण्यात आल्याचा गौप्यस्फोच पवार यांनी महासभेत केला. विशेष म्हणजे या दोन्ही ठरावांवर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले. महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी पवार यांच्या आरोपांचे खंडण करीत असे कोणत्याही प्रकारचे दोन प्रस्ताव नसून तसे असल्यास सदस्यांनी अशा प्रस्तावाची मूळ प्रत सादर करावी त्याची झेरॉक्स कॉपी सादर करू नये असे स्पष्ट केले. मात्र पवार त्यांच्या आरोपावर मात्र ठाम होते. त्यामुळे नेमका ठराव खरा कोणता आणि खोटा कोणता याबाबत मात्र संभ्रम कायम राहिला आहे.
ठाण्यात एकाच शैक्षणिक संस्थेला दिलेल्या भुखंडाचे झाले दोन ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:22 PM
एकाच शैक्षणिक संस्थेला देण्यात येणाऱ्या भुखंडाचे दोन ठराव झाले असल्याची गंबीर बाब नुकत्याच झालेल्या महासभेत उघडकीस आली आहे. परंतु दुसरा ठराव खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
ठळक मुद्देभुखंडाचे श्रीखंड खातय कोणदोनही ठरावांवर महापौरांच्या सह्या