शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

गुडविनच्या मालकांच्या शोधासाठी दोन विशेष पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 1:52 AM

आता या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन नौपाडा आणि शिवाजीनगर येथील दोन्ही गुन्हे हे आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी वर्ग करण्यात आले.

ठाणे : सुमारे १८० गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या सुनीलकुमार अकराकरण या ‘गुडविन’च्या व्यवस्थापकीय संचालकांसह पाच जणांच्या शोधासाठी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन विशेष तपास पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. डोंबिवली, शिवाजीनगर पाठोपाठ नौपाड्याचाही गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असून डोंबिवलीतील पलावा येथील आरोपीच्या घरी बुधवारी या पथकाने दिवसभर झडतीसत्र राबविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुंतवणुकीवर जादा व्याजाचे तसेच सोन्याचे दागिने देण्याचे प्रलोभन दाखवून ठाणे शहर आणि मुंबई परिसरातील १८० जणांची सुमारे साडे कोटींची फसवणूक करणाऱ्या सुनीलकुमार अकराकरण या ‘गुडविन’च्या व्यवस्थापकीय संचालकांसह पाच जणांविरुद्ध ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याआधी सुरुवातीला डोंबिवलीत चार कोटींच्या फसवणुकीचा तर अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन कोटी ७० लाखांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आधी डोंबिवलीचा गुन्हा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. आता या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन नौपाडा आणि शिवाजीनगर येथील दोन्ही गुन्हे हे आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी वर्ग करण्यात आले.

घरांच्या झडतीचा तपशिल गुलदस्त्यातदरम्यान, यातील आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले. त्यानुसार आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केली आहे. त्यातील पोलीस निरीक्षक शंकर सिंदरकर यांच्या पथकाने ३० आॅक्टोबर रोजी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांच्या डोंबिवलीतील पलावा येथील घरांची झडती घेतली. याठिकाणी पुराव्यांचीही जुळवाजुळव करण्यात आली. मात्र, या झडतीमध्ये काय हाती लागले, याचा तपशील आताच जाहीर करता येणार नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. एकाच वेळी ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील दुकाने बंद करून हा सोन्याच्या दागिन्यांचा व्यापारी पसार झाला असल्याने त्याने नियोजनबद्धपणे हे केल्याचे उघड झाले असल्यामुळे सावधपणे तपासाची पावले उचलावी लागत असल्याची माहिती तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.गुडविन ज्वेलर्सचे एपीएमसीतील दुकान बंदगुडविन ज्वेलर्स दुकान मालकाने नवी मुंबईतील एपीएमसीतील मार्केटलगतच्या सत्रा फ्लाझा इमारतीत असलेले दुकानदेखील बंद केले आहे. गुडविनचे दुकान बंद झाल्याचे समजल्यानंतर, या ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रक्कम गुंतविणाºया अनेक ग्राहकांनी रविवारी दुकानाकडे धाव घेतली. मात्र, ज्वेलर्सचे दुकान बंद असल्याचे, तसेच ज्वेलर्सकडून त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती न मिळाल्याने, या ग्राहकांनी अखेर एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुडविन ज्वेलर्सविरोधात लेखी तक्रारी दाखल केल्या.रविवारी सायंकाळपर्यंत १३0 तक्रारदारांनी गुडविन ज्वेलर्स विरोधात तक्रारी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, बुधवारी सांयकाळपर्यंत तक्रारीचा हा आकडा १९0 वर गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस