लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील खड्डे दुरुस्तीसाठी विरोधकांनी रान उठविले असतांनाच रस्त्यावरील खड्डयामुळे मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले (वय २३, रा. वुडसीझा सोसायटी, अमृत नगर, मुंब्रा, ठाणे) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाका येथे २१ सप्टेंबर २०२१ रोजी घोडबंदरकडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर खड्डयाला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवरील मोहम्मद फैजल हा तरुण रस्त्यावर मोटारसायकलसह जोरदार आदळला. या घटनेमध्ये मोहम्मद फैजल याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलीस कर्मचारी रूग्णवाहीकेसह दाखलही झाले होते. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णवाहीकेतून जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात घोडबंदरवरील खड्डयाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:18 AM
ठाण्यातील खड्डे दुरुस्तीसाठी विरोधकांनी रान उठविले असतांनाच रस्त्यावरील खड्डयामुळे मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले (वय २३, रा. वुडसीझा सोसायटी, अमृत नगर, मुंब्रा, ठाणे) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देगायमुख जकात नाक्याजवळील घटनाडोक्याला झाली गंभीर दुखापत